बदलापूर : विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालून स्थापना केलेल्या प्रसिद्ध समर्थवाडी या उपासना केंद्राचे शिल्पकार व संस्थापक सुमंत वासुदेव आठल्ये यांना बँकॉक येथील कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिवर्सिटीतर्फे ‘अध्यात्म’ या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत डॉक्टरेटने सन्मानित करण्यात आले आहे.
हॉटेल बायोके स्काय बँकॉक, थायलंड येथे अलीकडेच झालेल्या समारंभात डॉ. अनस अमातयाकुल, डॉ. मोहम्मद फहीम, डॉ. तासापोर्ण मोहम्मद, डॉ. प्रसेत सुक्सास्क्विन, प्रेम सिंग गील यांच्या हस्ते ही पदवी प्रदान करण्यात आली असल्याची माहिती समर्थ वाडीचे ट्रस्टी प्रद्युम्न आठल्ये व डॉ. हेमंत जगताप यांनी दिली.
या डॉक्टरेटसाठी जगभरातून साधारण 2500 प्रोफाइलचे विश्लेषण केले गेले. त्यापैकी काही निवडक जणांना डॉक्टरेटसाठी निश्चित करण्यात आले. सुमंत वासुदेव आठल्ये या निवडक काही जणांपैकी एक आहेत. “अध्यात्म” या क्षेत्रात डॉक्टरेट प्राप्त करणारे आठल्ये हे महाराष्ट्रातील व्यक्तीमत्व आहे. कासगाव सारख्या दुर्गम परिसरातील वातावरणातील प्रदूषण लक्षात घेऊन विविध प्रकारच्या औषधी वनस्पतींची तसेच विविध वृक्षांची लागवड येथे केली आहे. पाण्याचे महत्त्व जाणून व येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याचे महत्त्व पटविण्यासाठी प्रयत्नपूर्वक पाणी अडवा, पाणी जिरवा प्रकल्प राबवून 60000 घनलिटर क्षमतेचा प्रकल्प पूर्ण केला. शेततळ्यांची निर्मिती केली, सौर उर्जेची येणाऱ्या काळात गरज ओळखून सौर उर्जेवर चालणारी उपकरणे , सौर चूल यांसारखे प्रकल्प कार्यान्वित केले तसेच पवन चक्कीची उभारणी केली.
परिसरातील आदिवासी लोकानां बोलावून त्यांना कामाची मजुरी देऊन समर्थ वाडी व विकट गडावरील कामे केली व त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध करून दिला. याची दखल घेत आठल्ये यांना डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. समर्थ वाडीच्या कार्याची शासनाने दखल घ्यावी अशी अपेक्षा स्थानिक गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
समर्थवाडी उपासना केंद्राचे शिल्पकार सुमंत वासुदेव आठल्ये यांना डॉक्टरेट
Featured Post
मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम
मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...

-
अंबरनाथ : एकनाथ शिंदे गटात सामील असलेले शिवसेनेचे बंडखोर आमदार डॉ. बालाजी किणीकर यांना गोळी घालून जीवे मारण्याची धमकी देण्यात ...
-
INVESTITURE CEREMONY 2022-23 The Investiture ceremony being the most awaited ceremony by the students was celebrated at ...
-
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी राजभवन येथे आयोजि...
-
मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...
-
अंबरनाथ : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे, आ. गुलाबराव पाटील आणि आ. डॉ. बालाजी किणीकर यांच्या समर्थनार्थ आज अंबरनाथमध्ये एकव...