Showing posts with label घडामोडी. Show all posts
Showing posts with label घडामोडी. Show all posts

मुद्रांक शुल्क दर कमी करण्याचा निर्णय


 


 सध्याचा प्रचलित मुद्रांक शुल्क दर कमी करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. 


 अभिहस्तांतरणपत्राच्या दस्तावरील प्रचलित मुद्रांक शुल्काचा दर दि.1 सप्टेंबर, 2020 पासून ते दि.31 डिसेंबर, 2020 या कालावधीकरिता 3% ने तर दि.1 जानेवारी, 2021 ते दि.31 मार्च, 2021 या कालावधीकरिता 2% ने कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. 


'प्रशांत भूषण' शिक्षेविरोधात ऑल इंडिया लॉयर्स युनियनच्या वतीने तीव्र निदर्शने

ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवल्या प्रकरणी देशभरात विरोधाचे पडसाद उमटत असताना आज दिनांक 24 ऑगस्ट रोजी अंधेरी स्थित न्यायालय परिसराच्या बाहेर ऑल इंडिया लॉयर्स युनियनच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. न्यायपालिकेविरुद्ध केलेल्या दोन अवमानकारक ट्विट्सबद्दल सर्वोच्च न्यायालयाने गेल्या शुक्रवारी भूषण यांना फौजदारी स्वरूपाच्या अवमानासाठी दोषी ठरवलं.


सरन्यायाधीश शरद बोबडे हे नागपूरमधील राजभवनात अत्यंत महागड्या मोटारसायकलवर स्वार झाल्याचे गाजलेल्या चित्राला ट्विट करून वरिष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांनी टिप्पणी केली होती. तसेच सहा वर्षांतील सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करणारेही ट्विट केले होते. या दोन्ही ट्विटची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती अरुण मिश्रा, न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती कृष्ण मुरारी यांच्या खंडपीठाने त्यांना फौजदारी स्वरूपाच्या अवमानासाठी दोषी ठरवलं.


अवमान कायद्याप्रमाणे अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाळ यांचे मत जाणून घेणे बंधनकारक होते. परंतु भूषण प्रकरणाचा निकाल जाहीर करण्याआधी अ‍ॅटर्नी जनरल वेणुगोपाळ यांचे म्हणणे ऐकण्यात आले नाही, याबाबतही निदर्शने करणार्‍या वकिलांनी प्रश्न उपस्थित केला. अश्या दडपशाहीपूर्ण निकालांमुळे न्यायलायीन कामकाजासंदर्भात वकील आपली भूमिका स्पष्टपणे मांडू शकणार नाहीत. हा निकाल वकिलच नव्हे तर मानवाधिकार व कायदेक्षेत्रातील प्रश्नांवर काम करणार्‍या कार्यकर्ता व वकीलांना आपला मत किंवा मतभेद व्यक्त होण्यापासून अडवणारा आणि, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संवैधानिक अधिकारांचा खच्चीकरण करणारा आहे. न्यायाधीशांची कृती कुठलीही टिप्पणी आणि पडताळणीपासून मुक्त ठरवणार्‍या या आदेशाचा वापर अवमान कारवाईच्या भीती उभारून आवाज दडपून टाकण्यासाठी केला जाऊ शकतो. यातून न्यायालयाचे स्वातंत्र्य, गरिमा आणि महत्त्व कमी झाले असून लोकांची निराशा झाल्याचे ही मत निदर्शने करणार्‍या वकिलांनी मांडले.


एआयएलयूचे महाराष्ट्र राज्य सचिव एड.चंद्रकांत भोजगर यांनी यावेळी भूमिका मांडली की, ‘कोणतीही त्रुटी ही न्यायालय तसेच लोकांच्या निदर्शनास आणून देणे हे वकिलांचे कर्तव्य आहे. गेल्या काही वर्षांपासून न्यायालयीन कामकाजावर सार्वजनिक व्यासपीठ आणि समाजमाध्यमांवरून मोठय़ा प्रमाणात टिप्पण्या केल्या जात आहेत, अश्यातच सर्वोच्च न्यायालयात अनेक जनहीत याचिका मांडून लोकांना न्याय मिळवून देणार्‍या प्रतिभावंत वकील प्रशांत भूषण यांच्या ट्विटला न्यायव्यवस्थेने स्वतःच्या सुधारणेसाठी केलेली टीका म्हणून पाहणे आवश्यक होते. न्यायपालिका हाच लोकशाहीतील व्यक्तिस्वातंत्र्याची हमी देणारा आधार आहे. परंतु नागरिकांनी मत व्यक्त करणे तो न्यायपालिकेचा अवमान ठरवून शिक्षा जाहीर केल्याने सर्वोच्च न्यायालयाने चुकीचा पायंडा पाडला आहे. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक आदेशांचा अवमान सत्ताधारी राजकीय पक्षाचे नेते दररोज त्यांच्या विधांनांतून करत असताना त्याचे स्वतःहून संज्ञान मा. न्यायालयाने घेतल्याचे दिसत नाही. यातून संदेहास्पद परिस्थिति निर्माण झाली आहे ज्यासाठी स्वतः न्यायापलिका जबाबदार आहे. हा प्रश्न न्याय नव्हेतर प्रतिष्ठेचा बनवण्यात आला. एकाधिकरशाहीच्या बाजूने झुकत चाललेल्या या परिस्थितीत न्यायालयाला सामाजिक हित, लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी अधिक उदार आणि बांधील बनायला हवे.’


या निकालाबाबत राज्याचे माजी महाधिवक्ता दरायस खंबाटा, ज्येष्ठ वकील अरविंद दातार, जनक द्वारकादास, दुष्यंत दवे, श्याम दिवाणी, वृंदा ग्रोव्हर, मिहिर देसाई, आदी ४० हून अधिक ज्येष्ठ वकिलांनी आधीच एका जाहीर निवेदनाद्वारे नाराजी व्यक्त केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या प्रतिष्ठेचा विचार करता प्रशांत भूषण यांच्यावरील अवमाना खटले मागे घ्यावेत यासाठी भूषणच्या बाजूने 131 लोकांची स्वाक्षरी असलेले निवेदन देण्यात आले आहे. त्यात सर्वोच्च न्यायालयातील माजी मुख्य न्यायाधीश जस्ती चेलमेश्वर, न्यायमूर्ती मदन बी. लोकूर यांच्यासह दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश (निवृत्त) एपी शाह, पटना उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती (सेवानिवृत्त) अंजना प्रकाश, इतिहासकार रामचंद्र गुहा, लेखक अरुंधती रॉय आणि वकील इंदिरा जयसिंग यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.


जगातील अनेक देशांमध्ये आणि विशेषत: बळकट लोकशाही देशांमध्ये अवमानाचा कायदा अप्रचलित होत आहे. उदाहरणार्थ, अमेरिकेत न्यायालयांच्या निर्णयावर भाष्य करणे सामान्य आहे. अमेरिकेत सरकारच्या न्यायालयीन शाखेचा अवज्ञा किंवा अवमान केल्याच्या राज्यात समकालीन न्यायालयांची तरतूद असली तरी, देशाच्या घटनेतील पहिल्या दुरुस्तीपेक्षा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराला प्राधान्य देण्यात आले आहे. मात्र भारतात प्रचलित अनेक कायदे ब्रिटिश कायद्यांतून घेण्यात आले आहेत परंतु न्यायव्यवस्था परंतु २०१२ साली ब्रिटनच्याच कायदा आयोगाच्या शिफारशीनंतर 'कोर्टाला दोष देण्याचा' गुन्हा गुन्ह्यांच्या यादीतून काढून टाकण्यात आला. मात्र आपण अजूनही या कायद्याला कवटाळून बसलो असल्यावर या निदर्शनात टीका व्यक्त करण्यात आली. ऑल इंडिया लॉयर्स युनियनच्या वतीने आयोजित या निदर्शनात अॅड.चंद्रकांत भोजगर, अॅड. एलन परेरा, अॅड. बलवंत पाटील, अॅड. सुभाष गायकवाड, अॅड.काशिनाथ त्रिपाठी, अॅड. रमेश तिवारी अॅड.काझी, अॅड. के.सी. उपाध्याय, अॅड. राजेंद्र कोरडे आदी अनेक वकिल मोठ्याप्रमाणात सहभागी सहभागी झाले  होते.


खासगी रुग्णालयांकडून होणारी अवाजवी शुल्क आकारणी रोखण्यासाठी राज्यात भरारी पथके नेमण्याचे निर्देश - राजेश टोपे


राज्यात कोरोनाबाधितांच्या उपचारांसाठी खासगी रुग्णालये आणि रुग्णवाहिकांनी अवाजवी शुल्क आकारणी करू नये, असे निर्देश राज्य शासनाने वेळोवेळी दिले आहेत. या निर्देशांची अंमलबजावणी योग्यप्रकारे होत आहे की नाही याच्या तपासणीसाठी राज्यात भरारी पथके नेमण्यात आली आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज मुंबईत दिली. यासंदर्भात आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांना पत्र पाठविले असून तपासणी अहवाल तीन दिवसात शासनाला सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.


कोरोनाबाधित रुग्णांना वाजवी दरात उपचार मिळावेत यासाठी राज्य शासनाने २१ मे २०२० रोजी काढलेल्या अधिसूचनेद्वारे खासगी रुग्णालयांना कमाल दर मर्यादा निश्चित करून दिली आहे. त्याचबरोबर राज्यातील सर्व नागरिकांना महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना लागू करण्यात आली असून खासगी वाहने आणि रुग्णवाहिका अधिग्रहीत करून त्यांचे कमाल दरही निश्चित केले आहेत. तसेच खासगी रुग्णालयांनी खाटा उपलब्ध करून देण्याबाबतच्या अधिसूचनेच्या प्रभावी अमंलबजावणीचेही निर्देश देण्यात आले आहेत. असे असताना अद्यापही खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांकडून जास्तीचे शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याची दखल घेऊन राज्यातील जनतेच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयांची प्रभावी आणि काटोकोरपणे अंमलबजावणी व्हावी म्हणून जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी तसेच विभागीय आयुक्तांनी देखील त्यांच्या स्तरावर भरारी पथक नेमण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत.


 


कोरोना काळात सर्वेक्षण करणाऱ्या अंगणवाडी सेविका,मदतनीस कोविड सर्वेक्षण भत्यापासून वंचित


बदलापूर: कुळगाव बदलापूर नगर पालिका क्षेत्रात कोरोना संकटाच्या काळात कोविड-१९ सर्वेक्षणाचे काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना गेल्या तीन महिन्यापासून प्रोत्साहन भत्त्यापासून वंचित रहावे लागले असल्याचे समोर आले आहे. 


             कुळगाव बदलापूर नगर परिषद क्षेत्रात २ मे पासून अंगणवाडी सेविका व मदतनीस कोविड-१९ सर्वेक्षणाचे कामकाज करीत आहेत. या कामकाजाचे दररोजचे हजेरी रिपोर्ट व सर्वेक्षण शीट्स देण्यात आलेल्या निर्देशानुसार सर्वेक्षण सुपरवायजर यांच्याकडे जमा करण्यात आले आहेत. मात्र अद्यापपर्यंत हा प्रोत्साहन भत्ता देण्यात आलेला नाही.


आमच्या कामकाजाचा आढावा घ्यावा,आणि हा प्रोत्साहन भत्ता द्यावा, अशी मागणी या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी मुख्याधिकारी दीपक पुजारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, यासंदर्भात मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.


पोलीस दलातल्या जुळ्या भावांचा ८ दिवसांच्या फरकाने कोरोनामुळे मृत्यू


अंबरनाथ :- राज्यभरातील कोरोना रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत आहे. दरम्यान जनतेच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी पोलीस कर्मचारी देवाच्या रुपात हे रस्त्यावर उतरले आहेत. दरम्यान पोलिसांना कोरोना होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. दरम्यान अनेक पोलिसांना आपला जीवही गमवावा लागत आहे. त्यातच अंबरनाथमधून आणखी एक दु:खद घटना समोर आली आहे. पोलीस दलातल्या २ जुळ्या भावांचा ८ दिवसांच्या फरकाने कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


दिलीप रामचंद्र घोडके आणि जयसिंग रामचंद्र घोडके यांचा कोरोनामुळे दु:खद निधन झाले आहे. दोन्ही भाऊ पोलीस दलात सेवा बजावत होते. दिलीप घोडके हे उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात हवालदार होते, तर जयसिंग घोडके अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात हवालदार होते.


हे दोघेही जुळे भाऊ एकाच दिवशी पोलीस दलात भरती झाले होते आणि त्यांनी एकत्रच ट्रेनिंग देखील पूर्ण केलं होतं. दिलीप घोडके यांचा २० जुलै रोजी तर जयसिंग घोडके यांचा २८ जुलै रोजी कोरोनामुळे मृत्यू झाला. यामुळे पोलीस दलावर शोककळा पसरली आहे.


अंबरनाथ तालुक्याचा दहावीचा निकाल ९७.३७ टक्के


अंबरनाथ :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परिक्षेचा राज्याचा निकाल आज (29 जुलै) जाहीर झाला. एकूण निकाल 95.30 टक्के लागला. तर अंबरनाथ तालुक्यातील निकाल ९७.३७ टक्के इतका लागला आहे.


 यंदा दहावीच्या परीक्षेला अंबरनाथ तालुक्‍यात ७६४९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यापैकी ७४४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण निक टक्के इतका लागला आहे. दरम्यान, २९०९ विद्यार्थी  विशेष प्रावीण्य , २६९१ प्रथम श्रेणीत (First Class) उत्तीर्ण झाले आहेत. तर १४२३ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत (Second Class) उत्तीर्ण झाले आहेत. आणि ४२५ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत (Pass Class)पास झाले आहेत 


 


सरासरीनुसार भूगोल विषयाचे गुण


यंदा तालुक्यातील तब्बल ६४ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. कोरोनामुळे भूगोल विषयाचा पेपर रद्द करण्यात आला होता. मात्र, इतर विषयांच्या सरासरीनुसार भूगोल विषयाचे गुण देण्यात आले आहेत.


 


जिल्हयातील तालुकानिहाय निकालाची टक्केवारी


कल्याण ग्रामीण (९७.०८), अंबरनाथ (९७.३७), भिवंडी (९४.४३), मुरबाड (९५.९३), शहापूर (९६.३७), ठाणे मनपा (९६.६२), नवी मुंबई (९७.९५), भाईंदर (९७.३८), कल्याण-डोंबिवली (९५.२९), उल्हासनगर (९५.११), भिवंडी मनपा (९३.८७).


दहावी निकालाची तारीख अखेर जाहीर

 इयत्ता दहावी निकालाची तारीख अखेर जाहीर झाली आहे. उद्या म्हणजेच 29 जुलै रोजी दुपारी 1 वाजता बोर्डाच्या वेबसाईटवर दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. 


‘या’ वेबसाईटवर निकाल पाहता येणार 


 www.mahresult.nic.in 


www.sscresult.mkcl.org   


www.maharashtraeduction.com


दहावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी (29 जुलै) रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. या परीक्षेत झालेल्या सर्व विषयांचे गुण वेबसाईटवर पाहता येतील.


ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून विद्यार्थ्यांना अनिवार्य विषयांत (श्रेणी विषय वगळता) मिळालेल्या गुणांची पडताळणी (रिचेकिंग) किंवा उत्तरपत्रिकांची फोटोकॉपी, पुनर्मूल्यांकन, स्थलांतर प्रमाणपत्र यासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने स्वतः किंवा शाळेमार्फत अर्ज करण्याची सोय  उपलब्ध करून देण्यात आली आहे.


वडोलगावातील राहत्या घरांची जागा एमआयडीसीने अखेर वगळली, आमदार किणीकर यांच्या पाठपुराव्याला यश.


 


अंबरनाथ :- येथील पश्चिम भागातील वडोलगाव मधील रहिवाशांच्या राहत्या घरांच्या जागेचा प्रश्न अखेर  निकाली लागला आहे. वडोलगाव  येथील डी. डी. स्कीम १५ पैकी सिटी सर्वे नं.४००३ मधील सीट नं.१८ आणि २५ मधील जागेवर  महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अशी नोंद होती परंतु या ठिकाणी राहणारे रहिवाशी गेल्या ८० वर्षांपासून म्हणजेच महामंडळाच्या स्थापनेच्या अगोदर पासून  ह्या ठिकाणी वास्तव्यास आहेत. तसेच या सर्वे नंबरच्या सातबारा उताऱ्यावर तेथील इतर अधिकारात सन-१९३५ पासून वडोलगावातील घरांची नोंद असून गावची जागा व घरे सोडून बाकी जमिनीचा ताबा महामंडळाला दिला असल्याबाबतचा उल्लेख आहे. असे असताना हे औद्योगिक विकास महामंडळ गावची जागा वगळत नव्हते. याची दखल घेत स्थानिक आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांनी या भागात राहणाऱ्या रहिवाशांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन दरबारी गेली अनेक वर्षे पाठपुरावा केला . तसेच विधिमंडळाच्या अधिवेशनात देखील विविध पध्दतीने हा मुद्दा सभागृहाच्या समोर मांडला होता. आणि त्या अनुषंगाने तत्कालीन उद्योग मंत्री व उद्योग राज्यमंत्री यांच्या दालनात बैठक देखील घेण्यात आल्या होत्या. अखेर आमदार किणीकर यांच्या प्रयत्नांना यश आले आणि अखेर


महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने या जागा वगळल्या असल्याचे शुक्रवारी उद्योग विभागाने प्रसिद्ध केलेल्या राजपत्रात नमूद केले आहे. अखेरीस तेथील नागरिकांना न्याय मिळाला आहे.


आमदार  डॉ.बालाजी किनिकर यांनी सातत्यपूर्ण केलेल्या पाठपुराव्यामुळे ह्या भागातील नागरिकांना अखेर न्याय मिळाल्याने आमदार किणीकर यांनीमु ख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे,  उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचे विशेष आभार मानले आहेत.


 


#ShivSena #ShivsenaAmbarnath #shivsenaulhasnagar


अंबरनाथ शहरात येत्या रविवारी निर्जंतुकीकरण मोहीम, नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी येण्याचे टाळावे पालिकेने केले आवाहन


अंबरनाथ :- शहरातील कोरोना विषाणू संसर्ग बाधित रुग्णांची वाढती संख्या पहाता शहरातील सर्व महत्वाचे रस्ते, चौक आणि सार्वजनिक स्थळे याठिकाणी निर्जंतुकीकरण आणि फवारणीची मोहीम राबविण्यात निर्णय अंबरनाथ पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्या नुसार शहरामध्ये २६ जुलै रोजी ही मोहीम पार पडणार आहे.


 


अंबरनाथ शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता शहरातील सर्व महत्त्वाचे रस्ते चौक आणि सार्वजनिक स्थळे निर्जंतुकीकरण करण्याचा निर्णय नगरपालिका प्रशासनाने घेतला असून याठिकाणी औषध फवारणी करण्यात येणार आहे. कोरोना हा श्वसन संस्थेने होणारा आजार असल्याने वाढल्या विषाणू प्रसाराला आळा घालण्यासाठी अंबरनाथ शहरामध्ये रविवार दि. २६ जुल, २०२० रोजी सार्वत्रिक निर्जतुकीकरण आणि फवारणीची मोहिम हाती घेण्यात येत आहे. तरी रविवार दि. २६ जुलै, २०२० रोजी रस्त्यावर तसेच सार्वजनिक ठिकाणी येण्याचे टाळावे. असे आवाहन नगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.


प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये (Containment Zone) असणारे बंदी विहित मुदतीपर्यंत चालू रहाणार असल्यामुळे तेथील नागरिकांनी त्यांच्या अत्यावश्यक गरजांचे नियोजन रविवार पूर्वी करुन घ्यावे. असे आवाहन ही मुख्याधिकारी यांनी केली आहे.


खाजगी कोविड रुग्णालयांकडून रुग्णांची लूट?  बिलांचे लेखापरीक्षण करून रुग्णांना द्यावा परतावा : संभाजी शिंदे 


बदलापूर : शासनाने दर निर्धारित केलेले असतानाही बदलापुरातील खाजगी कोविड रुग्णालयांनी रुग्णांची लूट केली असल्याचा आरोप ठाणे जिल्हा नियोजन समिती सदस्य व भाजपाचे माजी शहराध्यक्ष संभाजी शिंदे यांनी केला आहे. या सर्व रुग्णालयांतील बिलांचे लेखापरीक्षण करून बिलाची वाढीव रक्कम रुग्णांना परत मिळावी अशी मागणीही शिंदे यांनी केली आहे. 


               कुळगाव बदलापूर नगर परिषद क्षेत्रातील खाजगी कोविड रुग्णालयांच्या बिलांबाबत नागरिकांच्या प्रचंड तक्रारी आहेत. खाजगी कोविड रुग्णांलयाना शासनाने दर निर्धारित करून दिले आहेत. त्यानुसारच रुग्णांना दर आकारणी करणे सक्तीचे असताना या रुग्णालयांनी अव्वाच्या सव्वा बिले देऊन नागरिकांची एकप्रकारे लूट केली असल्याचे संभाजी शिंदे यांचे म्हणणे आहे. शासनाच्या निर्देशानुसार ठाणे महानगरपालिका व इतर महानगरपालिकांनी या सगळ्या बिलांची पुनर्तपासणी करण्यासाठी लेखापरीक्षकांची नेमणूक केली आहे. त्याच धर्तीवर कुळगाव बदलापूर नगर परिषदेनेही बदलापुरातील खाजगी कोविड रुग्णालयांनी दिलेल्या बिलांची तपासणी करण्यासाठी लेखापरीक्षकांची नेमणूक करावी. गेल्या दोन महिन्यात खाजगी कोविड रुग्णालयांनी दिलेल्या बिलांची या लेखापरीक्षकांमार्फत तपासणी करून वाढीव बिलाच्या रकमेचा पुन्हा रुग्णांना परतावा देण्यात यावा, अशी संभाजी शिंदे यांची मागणी आहे. कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे प्रशासक जगतसिंग गिरासे यांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे ही मागणी केली असल्याचे संभाजी शिंदे यांनी सांगितलेकोणत्याही व्यक्तीकडून वीस हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम रोख स्वरूपात घेऊ नये असे आयकर विभाग, आरबीआय व अर्थमंत्रालयाचे सक्त निर्देश आहेत. असे असताना गेल्या दोन महिन्यांच्या काळात बदलापुरातील खाजगी कोविड रुग्णालयांनी बिलासाठी रुग्णांकडून लाखो रुपये रोख स्वरूपात घेतले आहेत.याबाबतही या रुग्णालयांची चौकशी करण्यासाठी नगर परिषदेने आयकर विभागाला कळवावे, अशी मागणीही आपण या निवेदनाद्वारे केली असल्याचे संभाजी शिंदे यांनी स्पष्ट केले.


खाजगी कोविड रुग्णालयांकडून रुग्णांची लूट?   बिलांचे लेखापरीक्षण करून रुग्णांना द्यावा परतावा : संभाजी शिंदे 


बदलापूर : शासनाने दर निर्धारित केलेले असतानाही बदलापुरातील खाजगी कोविड रुग्णालयांनी रुग्णांची लूट केली असल्याचा आरोप ठाणे जिल्हा नियोजन समिती सदस्य व भाजपाचे माजी शहराध्यक्ष संभाजी शिंदे यांनी केला आहे. या सर्व रुग्णालयांतील बिलांचे लेखापरीक्षण करून बिलाची वाढीव रक्कम रुग्णांना परत मिळावी अशी मागणीही शिंदे यांनी केली आहे. 


               कुळगाव बदलापूर नगर परिषद क्षेत्रातील खाजगी कोविड रुग्णालयांच्या बिलांबाबत नागरिकांच्या प्रचंड तक्रारी आहेत. खाजगी कोविड रुग्णांलयाना शासनाने दर निर्धारित करून दिले आहेत. त्यानुसारच रुग्णांना दर आकारणी करणे सक्तीचे असताना या रुग्णालयांनी अव्वाच्या सव्वा बिले देऊन नागरिकांची एकप्रकारे लूट केली असल्याचे संभाजी शिंदे यांचे म्हणणे आहे. शासनाच्या निर्देशानुसार ठाणे महानगरपालिका व इतर महानगरपालिकांनी या सगळ्या बिलांची पुनर्तपासणी करण्यासाठी लेखापरीक्षकांची नेमणूक केली आहे. त्याच धर्तीवर कुळगाव बदलापूर नगर परिषदेनेही बदलापुरातील खाजगी कोविड रुग्णालयांनी दिलेल्या बिलांची तपासणी करण्यासाठी लेखापरीक्षकांची नेमणूक करावी. गेल्या दोन महिन्यात खाजगी कोविड रुग्णालयांनी दिलेल्या बिलांची या लेखापरीक्षकांमार्फत तपासणी करून वाढीव बिलाच्या रकमेचा पुन्हा रुग्णांना परतावा देण्यात यावा, अशी संभाजी शिंदे यांची मागणी आहे. कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे प्रशासक जगतसिंग गिरासे यांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे ही मागणी केली असल्याचे संभाजी शिंदे यांनी सांगितलेकोणत्याही व्यक्तीकडून वीस हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम रोख स्वरूपात घेऊ नये असे आयकर विभाग, आरबीआय व अर्थमंत्रालयाचे सक्त निर्देश आहेत. असे असताना गेल्या दोन महिन्यांच्या काळात बदलापुरातील खाजगी कोविड रुग्णालयांनी बिलासाठी रुग्णांकडून लाखो रुपये रोख स्वरूपात घेतले आहेत.याबाबतही या रुग्णालयांची चौकशी करण्यासाठी नगर परिषदेने आयकर विभागाला कळवावे, अशी मागणीही आपण या निवेदनाद्वारे केली असल्याचे संभाजी शिंदे यांनी स्पष्ट केले.


अंबरनाथ बदलापूर मध्ये फक्त कंटेनमेंट झोन मध्येच लॉकडाऊन. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा


बदलापूर :- ठाणे जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत लॉकडाऊनमध्ये वाढ (Lockdown Extension) करण्याचा निर्णय घेण्यात आला होता परंतु यात बदल करत ठाणे जिल्ह्यात नगरपालिका, नगरपंचायती आणि ग्रामीण क्षेत्रातील फक्त कंटेनमेंट झोनमध्ये 31 जुलैपर्यंत लॉक डाऊन करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला आहे.


 कोरोनाचा (Corona) वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दोन जुलै रोजी ठाणे जिल्ह्यातील नगरपालिका नगरपंचायत आणि ग्रामीण भाग लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी घेतला होता त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील नगरपालिका नगरपंचायत क्षेत्रात लोक डाऊन करण्यात आले होते त्यानंतर आणखी सात दिवस लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला . 


जिल्हाधिकारी यांनी लोक डाऊन संदर्भात घेतलेल्या निर्णय नुसार आज लोक डॉन चा शेवटचा दिवस होता व त्यामुळे जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आज आदेश जारी करून ठाणे जिल्ह्यातील नगरपालिका नगरपंचायत भागातील म्हणजेच अंबरनाथ बदलापूर मुरबाड ह्या भागातील फक्त कन्टेन्ट झोनमध्ये 31 जुलैपर्यंत लोक डॉन करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिका हद्दी करिता मुख्याधिकारी यांना कंटेनमेंट झोन ठरविण्याचे अधिकार दिले आहेत तर शहापूर मुरबाड नगरपंचायत तसेच ग्रामीण भागाकरिता उपविभागीय अधिकारी यांना कंटेनमेंट झोन जाहीर करण्याचे अधिकार दिले आहेत.त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या कंटेनमेंट  झोनमध्ये  31 जुलैपर्यंत लॉक डाउन राहणार आहे.


मोहिते महाविद्यालयात मुलींची बाजी, महाविद्यालयाचा निकाल ९४.२१%

खोडाळा : गिरीवासी सेवा मंडळ कल्याण संचलित मातोश्री यशोदाबाई मुरलीधर मोहिते कला,वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय खोडाळा जोगलवाडी या महाविद्यालयात बारावीच्या परीक्षेमध्ये मुलींनी बाजी मारली.


           कला शाखेतून कुवर कुणाली गंगाराम ७१.३८ टक्के मिळवून प्रथम आली, तर डेंगा रेणुका विठ्ठल ७१.२३ टक्के मिळवून दुसरी आली. वाणिज्य शाखेतून मुस्कान फ़िरोज पठाण ७४.७६ टक्के मिळवून प्रथम आली, तर कोमल संतोष व्यापारी ७२.९२ टक्के मिळवून दुसरी आली. विज्ञान शाखेतून औसरकर ओमकार गणेश ७२.९२ टक्के गुण मिळवून प्रथम आला, तर डोळस हर्ष दीपक ७०.९२% टक्के मिळवून दुसरा आला.


               मोहिते महाविद्यालयात बारावीच्या परीक्षेकरिता १२१ विद्यार्थी बसले होते त्यात ११४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.तर महाविद्यालयाचा निकाल ९४.२१% लागला. महाविद्यालयामध्ये कला शाखेकरिता ४६ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते त्यात ३९ उत्तीर्ण झाले. वाणिज्य आणि विज्ञान शाखेचा निकाल १००% लागला असून अनुक्रमे ४१ आणि ३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.


महाविद्यालयाचे संस्थापक सुधाकर मोहीते व अध्यक्ष चंद्रमणी मोहीते यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.


लॉकडाऊन रिटर्न च्या काळात वाढले तब्बल 586 रुग्ण


 


बदलापूर :- ठाणे जिल्हा क्षेत्रात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता केवळ त्या त्या ठिकाणचे हॉटस्पॉट बंद करुन विशेष फरक पडणार नाही. असे कारण देत ठाणे जिल्हाधिकारी यांनी ठाणे जिल्हयातील सर्व नगरपरिषद/नगर पंचायत व ग्रामीण क्षेत्रात दि. 2 जुलै पासून पुन्हा एकदा लोक डाऊन जाहीर केले. परंतु दोन जुलै ते 12 जुलै या काळात बदलापूर शहरात मात्र 586 रुग्णांची वाढ असल्याचे दिसून आले आहे.


जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊन चे आदेश दिले त्यादिवशी म्हणजेच एक जुलै रोजी बदलापूर शहरात ८०७ रुग्ण होते त्यापैकी ३९४ रुग्ण बरे होऊन घरी गेले होते आणि ३९८ रुग्णांवर पुढील उपचार सुरू होते. तर आज 12 जुलै रोजी शहरातील कोरोना रुग्णांची संख्या १३९३ इतकी झाली आहे त्यापैकी ७१४ रुग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे.६५९ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


तब्बल 84 दिवसांच्या लॉकडाऊन नंतर १ जूनपासून राज्य शासनाने अनलॉक ची प्रक्रिया सुरू केली त्यावेळी बदलापूर शहरात केवळ २२९ रुग्ण होते तर ठाणे जिल्हाधिकारी यांनी लॉक डाऊन रिटर्न हे घोषणा केली त्या वेळी शहरातील कोरोना रुग्णांची संख्या ८०७ इतकी होती याचा अर्थ अनलॉकच्या ३१ दिवसांच्या काळात ५७८ रुग्ण वाढले होते.


आता पुन्हा एकदा जिल्हाधिकारी ठाणे यांनी लॉकडाऊन 19 जुलैपर्यंत वाढविले आहे. लॉकडाउनच्या काळातही रुग्ण संख्या कमी झालेली नाही किंवा मंदावलेली नाही अशावेळी कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन हे खरंच प्रभावी अस्त्र आहे का असा? प्रश्न सर्वसामान्य नागरिक उपस्थित करीत आहेत.


सरकारचा मोठा निर्णय ! राज्यातल्या ग्रामीण-शहरी तरुणांना नोकरीची संधी, पोलीस खात्यात 10 हजार जागा भरणार


पोलिस शिपाई भरतीच्या निर्णयानं शहरी व ग्रामीण तरुणांना नोकरीची संधी


राज्यात पोलिस शिपाई संवर्गातील 10 हजार जागा भरणार,*


नागपूरच्या काटोल इथं एसआरपीएफची महिला बटालियन*


 उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती* 


मुंबई,  :- राज्यातील कायदा-सुव्यवस्था भक्कम करण्याबरोबरच पोलिस दलावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी राज्यातील पोलिस शिपाई संवर्गात दहा हजार तरुणांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याचा फायदा शहरी व ग्रामीण तरुणांना होईल, त्यांना पोलिस दलात सेवेची संधी मिळेल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली. नागपूरमधील काटोल येथे राज्य राखीव पोलिस दलाच्या महिला बटालियनची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात आज महत्वाची बैठक झाली. बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक, गृह विभागाचे विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता, महसुल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस. श्रीनिवास, एसआरपीएफच्या अपर पोलिस महासंचालक अर्चना त्यागी आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 


बैठकीत गृह विभागाकडून पोलिस शिपाई पदाच्या 8 हजार जागा भरण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यात आणखी 2 हजार जागा वाढवून एकूण 10 हजार पोलिस शिपाई भरती करण्याचे व ही भरतीप्रक्रिया येत्या वर्षभरात पूर्ण करण्याचे निर्देश दिले. कोरोनासंकटाच्या पार्श्वभूमीवर ही भरतीप्रक्रीया विनाअडथळा यशस्वीपणे कशी राबवता येईल, याचा विचार करुन सर्वंकष प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत तातडीने मांडण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले. मंत्रिमंडळ मंजूरीनंतर भरतीप्रक्रियेची कार्यवाही वेग घेईल, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.


राज्यात 10 हजार पोलिस शिपायांची भरती करण्याबरोबरच नागपूरच्या काटोल येथे राज्य राखीव पोलिस दलाची महिला बटालियन स्थापन करण्याच्या निर्णयावरही आज उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. या बटालियनसाठी 1384 पदे निर्माण करण्यात येणार असून प्रत्येक टप्प्यात 461 प्रमाणे 3 टप्प्यात ही पदे भरण्यात येणार आहेत. यातूनही शहरी व ग्रामीण युवतींना पोलिस सेवेची संधी मिळणार असल्याचेही उपमुख्यमंत्री म्हणाले.


राज्यातील सण, उत्सव, सामाजिक-राजकीय मोर्चांमध्ये महिलांची लक्षणीय संख्या लक्षात घेऊन कायदा-सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी ही बटालियन स्थापन करण्यात येणार आहे. उपराजधानी नागपूरची भौगोलिक स्थिती, रेल्वे, विमान व दळणवळणाच्या साधनांची उपलब्धता लक्षात घेवून एसआरपीएफच्या या केंद्रासाठी नागपूर जिल्ह्याची शिफारस करण्यात आली होती. त्याअनुषंगाने काटोल गावच्या हद्दीत शासकीय जमिन उपलब्ध असल्याने त्याठिकाणी ही बटालियन स्थापन करण्यात येणार आहे. आजच्या या निर्णयांमुळे राज्यातील युवक, युवतींना पोलिस सेवेत दाखल होण्याची संधी मिळेलंच, त्याचबरोबर पोलिसांवरील ताण कमी होण्यास,कायदा-सुव्यवस्था अधिक भक्कम होण्यास मदत होईल, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.


 


रुग्णवाहिकांच्या अवाजवी दर आकारणीतून सामान्यांची होणार सुटका; कोरोनाबाधीतांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी,  खासगी रुग्णवाहिका, वाहने ताब्यात घेणार : शासन निर्णय जाहीर


मुंबई, : राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका तसेच खासगी वाहने जिल्हा प्रशासनाने अधिग्रहीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत आज आरोग्य विभागामार्फत शासन निर्णय जाहीर केला आहे. अधिग्रहीत केलेले रुग्ण वाहक वाहन जास्त गंभीर नसलेल्या रुग्णांसाठी वापरण्यात येईल.


राज्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असताना रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिकांची आवश्यकता भासत आहे. त्यासाठी त्यांची संख्या वाढविण्याकरीता जिल्ह्यांमध्ये रुग्णालये, स्वयंसेवी संस्था यांच्याकडील रुग्णवाहिका उपलब्ध करून घेतानाचा गरज भासल्या, खासगी वाहन पुरवठादारांची वाहने देखील रुग्ण वाहक वाहन म्हणून वापर करण्याचा निर्णय झाला आहे. 


कोरोना काळात खासगी रुग्णवाहिकांसाठी रुग्णांकडून अवाजवी दर आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी होत्या. त्याची दखल घेऊन खासगी रुग्णवाहिका आणि वाहने अधीग्रहीत करताना त्यांचा दर निश्चित करून ते उपलब्ध करून देण्यात येईल. २४ तास ह्या अधीग्रहीत केलेल्या रुग्णवाहिका आणि वाहने उपलब्ध राहतील. रुग्णवाहिका अधिग्रहीत करण्याची प्रक्रिया जिल्हाधिकारी (महापालिका क्षेत्र वगळता ) आणि महापालिका आयुक्त (महापालिका क्षेत्रात) राबवतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.


प्रादेशिक परिवहन प्राधीकरणाने ठरवून दिलेल्या दरानुसार भाडे तत्वावरील वाहनांचे दर निश्चित करावे. त्यासाठी वाहनाचे भाडे, प्रत्यक्ष प्रवासाचे अंतर (किलोमीटर्स) याचा विचार करण्यात यावा असे या शासन निर्णयात म्हटले आहे.


या रुग्णवाहिका वाहन चालकासह, इंधनाच्या खर्चासह भाडे तत्वावर घेता येतील अथवा जेथे वाहन चालक उपलब्ध नसेल तेथे रुग्णवाहिका मासिक भाडेतत्वावर ताब्यात घेण्यात येतील. त्यांना स्थानिक परिवहन मंडळ, राज्य परिवहन, चालक पुरवठा कंपन्या, स्थानिक प्रशासनाकडील वाहनचालकांच्या सेवा अधीग्रहीत करून चालक उपलब्ध केले जातील. यारुग्णवाहिकांच्या इंधनाचा खर्च स्थानिक प्रशासनामार्फत केला जाईल.


लक्षणे नसलेल्या तसेच इतर रुग्णांसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने या अधीग३हीत केलेल्या वाहनांमध्ये किरकोळ बदल करून रुग्णवाहक वाहन म्हणून त्याचा वापर करावा व आवश्यकतेनुसार वाहने ताब्यात घ्यावीत, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी शासन निर्णयात म्हटले आहे.


• जिल्हाधिकाऱ्यांनी अधीग्रहीत केलेल्या रुग्णवाहिका व वाहनांव्यतीरिक्त अन्य खासगी रुग्णवाहिका व वाहनांसाठी प्रादेशीक परिवहन प्राधीकरणामार्फत किमान दर निश्चित करण्यात यावा. या दरामप्रमाणे खासगी वाहनचालक आकारणी करीत आहेत हे तपासण्यासाठी तपासणी यंत्रणा तयार करण्यात येईल.


• जादा दर आकारणीच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त त्यांच्या कार्यक्षेत्रात यंत्रणा तयार करतील. 


• अधीग्रहीत केलेली रुग्णवाहिका २४ तास उपलब्ध असेल


• रुग्णवाहिकेत स्मार्ट फोन, इंटरनेट सुविधा असेल. टोल फ्री १०८ रुग्णवाहिकेचे ॲप त्यात असेल ते या क्रमांकाच्या प्रणालीशी जोडले जाईल.


• रुग्णवाहिकेला संपर्कासाठी रुग्णांना १०८ क्रमांक किंवा स्थानिक प्रशासनाने सुरू केलेल्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधता येईल.  


 


अजय जाधव..१.७.२०२०


कोरोना पेक्षा ग्राहकांना महावितरण'च्या बिलांची धास्ती

 


बदलापूर :  सोमवारी सकाळपासून महावितरणचे कार्यालय उघडल्यानंतर विज बिल कमी करण्यासाठी बदलापूर पश्चिमेकडील ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. गेल्या तीन महिन्यांपासून ज्यादा आलेले बिल कोणत्याही परिस्थितीत कमी करून द्या, अशी एकमुखी मागणी हे जमलेले ग्राहक करत होते. आपल्या तक्रारी मांडताना महावितरणचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने ग्राहकांच्या संतापात भर पडत होती. या वेळी येथे उपस्थित असलेल्या महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ग्राहकांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र ग्राहक कोणत्याही परिस्थितीत समजून घ्यायला तयार नव्हते. कोरोना च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना वीज बिले आली नाहीत. तीन महिन्यानंतर ती बिले प्रचंड आली आहेत. त्यामुळे ग्राहक भरडला गेला आहे. ग्राहक जेव्हा महावितरणच्या वीज बिल भरणा केंद्र जवळ आणि कार्यालय जवळ आले तेव्हा येथे ग्राहकांची संख्या प्रचंड होती. त्यामुळे याठिकाणी सोशल डिस्टंसिंग ते अक्षरशः तीन-तेरा वाजल्याचे पाहायला मिळालं. उपस्थित असलेल्या अनेक ग्राहकांना तर कोरोना पेक्षा महावितरणच्या आलेल्या बिलांची जास्त धास्ती असल्याचं दिसत होते. समाज माध्यमांवर अशा प्रकारे प्रचंड व्हिडिओ व्हायरल झाल्याने महावितरण आता या वाढलेल्या वीज बिलाबाबत नक्की काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. वेगवेगळ्या भागात दररोज महावितरणची बिल्ल पोहोचत असल्याने ज्या भागात जशी वीज बिले पोहोचत आहेत असे त्या भागातील नागरिक येऊन महावितरणच्या कार्यालयात आपले गाऱ्हाणे मांडत आहेत. 


 बदलापूर पूर्वेला देखील अशाच प्रकारे वीज बिलांच्या तक्रारींसाठी नागरिकांनी लांबचलांब रांग लावली होती. या ठिकाणी मात्र महावितरणने मेन गेट बंद करून दहा दहा जणांना आज सोडत होते. मात्र येथेही सोशल डिस्टंसिंग ते कोणत्याही प्रकारे नियमांचे पालन करण्यात येत नव्हते. बदलापूर शहरात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत असताना महावितरणच्या कार्यालयाजवळ ग्राहक प्रचंड संख्येने जमुन एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात गोंधळ घालत असल्याने भविष्यात महावितरणचे कर्मचारी आणि ग्राहक दोघांनाही कोरोना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महावितरणने या तक्रारीबाबत आणि वाढीव वीज बदलांबाबत तातडीने निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत सुज्ञ ग्राहक व्यक्त करत आहेत.  सरकार करत असलेल्या कोरोना रोखण्यासाठीच्या उपाययोजना अशा प्रकारामुळे गांभीर्य उरणार नसल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत।



बदलापूरमध्ये आतापर्यंत ९४ हजारांची झाली तपासणी;   घरोघरी प्राथमिक चाचणी मोहिमेला उत्तम प्रतिसाद..


बदलापूर :- कुळगाव बदलापूर नगरपालिका हद्दीत वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या पाहता शहरात पालिका प्रशासनाने घरोघरी जाऊन प्राथमिक चाचणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे. सात दिवसांत पालिकेच्या टीमने ३३,२३१ घरांमध्ये जाऊन ९४८८३ नागरिकांची तपासणी केली आहे.यातील केवळ ३५ नागरिक संशयित आढळले आहेत, अशी माहिती नगरपालिका प्रशासनामार्फत देण्यात आली आहे.


"दहा दिवसांची ही विशेष मोहीम असून यात दोन सदस्यांचे एक पथक अशी 107 पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकाच्या सदस्यांना थर्मामीटरपासून सर्व आवश्यक ते साहित्य पुरविण्यात आले आहे. आज एकूण ९८ पथकांनी, ४८०६ कुटुंबातील ३३,२३१ व्यक्तींची आरोग्य तपासणी केली. आतापर्यंत १४,४२९ कुटुंबांचे आरोग्य सर्वेक्षण झाले असून सर्वेक्षणाच्या माध्यमातून ९४,८८३ व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. यातील केवळ ३५ व्यक्ती संशयित म्हणून आढळले आहेत.यापुढे उर्वरित सर्व कुटुंबीयांचीसुद्धा तपासणी करण्यात येणार आहे" असे उपविभागीय अधिकारी जगतसिंग गिरासे यांनी सांगितले आहे. पालिकेच्या पथकांकडून चांगले काम सुरु असून त्याला नागरिकांचेही सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.


जगतसिंग गिरासे यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेच्या खाते प्रमुखांची नुकतीच बैठक झाली. यावेळी गिरासे यांनी अधिकाऱ्यांना या योजनेची सविस्तर माहिती समजावून सांगितली. यावेळी मुख्याधिकारी दीपक पुजारी, जयेश भैरव, डॉ. राजेश अंकुश, डॉ. हरेश पाटोळे, राजेंद्र बोरकर, प्रवीण वडगाये, दशरथ राठोड, किरण गवळे, सुरेंद्र उईके, सिद्धार्थ पवार, विलास मुठे, प्रतीक्षा सावंत आदी अधिकारी उपस्थित होते.


शहरातील सर्व आजी-माजी लोकप्रतिनधी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते, सामाजिक, शैक्षणिक संघटनांचे पदाधिकारी सदस्य आणि शहरातील नागरिक देखील पालिकेच्या पथकांमधील सदस्यांना सर्व माहिती देऊन सहकार्य करीत आहेत


क्रीडा संकुलात सुरू करा १००बेडचे कोविड केअर सेंटर : भाजपाची मागणी 


बदलापूर: बदलापूरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे बदलापुरात आणखी कोविड केअर सेंटरची आवश्यकता असल्याने बदलापूर पूर्वेकडील तालुका क्रीडा संकुलात १०० बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करावे, अशी मागणी भाजपाचे माजी शहराध्यक्ष व ठाणे जिल्हा नियोजन समिती सदस्य संभाजी शिंदे यांनी केली आहे. 


         बदलापूरात गेल्या १५ दिवसात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. बदलापूर पश्चिमेकडील सोनिवली येथे नगर परिषदेच्या माध्यमातून कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले असले तरी तेथे ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची व्यवस्था उपलब्ध नाही. त्यामुळे कोरोनाबधित रुग्णांना खाजगी रुग्णालयांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी अलीकडेच महाराष्ट्र शासनाने नगर परिषदेला ७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.या निधीतून सोनिवली येथील कोविड केअर सेंटरमध्ये १५० बेडची व्यवस्था करणे तसेच ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आदी सुविधा देणे शक्य आहे. त्याचबरोबर कारमेल शाळेसमोर असलेल्या तालुका क्रीडा संकुलातही सर्व सोयीसुविधायुक्त कोविड केअर सेंटरची उभारणी करणे शक्य आहे. याठिकाणी उपलब्ध असलेल्या इमारतीत डॉक्टर व रुग्णालय कर्मचाऱ्यांची व्यवस्था करता येऊ शकेल, तसेच उर्वरित जागेत बेडची उभारणी करणे शक्य होईल,असे संभाजी शिंदे यांचे म्हणणे आहे.त्याचप्रमाणे बदलापूर जवळील चामटोळी येथे सुरू करण्यात आलेले कोविड डेडीकेटेड खाजगी हॉस्पिटल नगर परिषदेने ताब्यात घेतल्यास कोरोनाबधितांवर चांगल्याप्रकारे उपचार करणे शक्य होईल,असेही शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, यासंदर्भात आपण कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या यांना निवेदन सादर केले असल्याची माहितीही संभाजी शिंदे यांनी दिली. 


   बदलापुरात मच्छी मार्केट, भाजी विक्रेते व रस्त्यावरील फेरीवाले यांच्याकडून सोशल डिस्टनसिंगचे पालन होत नासल्याकडेही संभाजी शिंदे यांनी लक्ष वेधले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पोलीस व नगर परिषदेच्या समन्वयाने याठिकाणी सोशल डिस्टनसिंगचे पालन होईल, यासाठी उपाययोजना करण्याची मागणी संभाजी शिंदे यांनी केली आहे. गर्दीच्या ठिकाणी पाण्याच्या टाक्या तसेच सॅनिटायजर वा हँडवॉश उपलब्ध करून देऊन नागरिकांना हात धुण्याची व्यवस्था करून द्यावी, खरेदी व इन्स्टॉलेशन प्रक्रिया पूर्ण झालेली असतानाही धूळ खात पडलेल्या बायोटॉयलेटची उभारणी करून नागरिकांना उपलब्ध करून द्यावेत, सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामान्य थंडी तापाच्या रुग्णांची होत असलेली प्रचंड गैरसोय टाळण्यासाठी विभागवार फिवर तपासणी क्लिनिक सुरू करण्यात यावे, आदी मागण्याही आपण निवेदनाद्वारे केल्या असल्याचे संभाजी शिंदे यांनी स्पष्ट केले.


बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात कोरोनाचा शिरकाव सात कर्मचारी, एक अधिकारी पॉझिटिव्ह

देशात करोना व्हायरसचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. महाराष्ट्रावर आलेल्या या करोना संकटात पोलिस आपल्या आरोग्याची पर्वा न करता सेवा करत आहे. ही सेवा बजावत असताना पोलिस दलातील कर्मचाऱ्यांना कोरोना ची लागण होत असल्याचे दिसून आले आहे. आता ह्या कोरोनाने बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात शिरकाव केला असून तब्बल सात कर्मचारी एक अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. त्यातील एक अधिकारी हे दोन दिवसांपूर्वीच कोरोना पॉझिटिव झाले होते. तर त्यानंतर आज सात कर्मचारी पॉझिटिव्ह आले आहेत. 


बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात एका आरोपीला आणले होते तो बाधित आढळल्यानंतर सात कर्मचारी पॉझिटिव्ह झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यातील एकमेकांच्या संपर्कात असलेल्या दहा जणांचे घेण्यात आले होते. त्यातील सात जण पॉझिटिव्ह आले आहेत. तर बदलापुरात आज 31 रुग्ण आढळले असून बाधितांचे नातेवाईक व पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. बदलापूर पश्चिमेकडे रमेशवाडी येथील एका 56 वर्षीय महिलेचा आज मृत्यू झाला असून बदलापूराय एकूण 14 जणांचा मृत्यू झाले असून कोरोना बाधितांचे संख्या ही 649 वर गेली आहे. 


राज्यात करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारनं लॉकडाऊन घोषित केला होता. लॉकडाऊनच्या काळात पोलिसांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य निभावलं आहे. 



Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...