खोडाळा : गिरीवासी सेवा मंडळ कल्याण संचलित मातोश्री यशोदाबाई मुरलीधर मोहिते कला,वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय खोडाळा जोगलवाडी या महाविद्यालयात बारावीच्या परीक्षेमध्ये मुलींनी बाजी मारली.
कला शाखेतून कुवर कुणाली गंगाराम ७१.३८ टक्के मिळवून प्रथम आली, तर डेंगा रेणुका विठ्ठल ७१.२३ टक्के मिळवून दुसरी आली. वाणिज्य शाखेतून मुस्कान फ़िरोज पठाण ७४.७६ टक्के मिळवून प्रथम आली, तर कोमल संतोष व्यापारी ७२.९२ टक्के मिळवून दुसरी आली. विज्ञान शाखेतून औसरकर ओमकार गणेश ७२.९२ टक्के गुण मिळवून प्रथम आला, तर डोळस हर्ष दीपक ७०.९२% टक्के मिळवून दुसरा आला.
मोहिते महाविद्यालयात बारावीच्या परीक्षेकरिता १२१ विद्यार्थी बसले होते त्यात ११४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.तर महाविद्यालयाचा निकाल ९४.२१% लागला. महाविद्यालयामध्ये कला शाखेकरिता ४६ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते त्यात ३९ उत्तीर्ण झाले. वाणिज्य आणि विज्ञान शाखेचा निकाल १००% लागला असून अनुक्रमे ४१ आणि ३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
महाविद्यालयाचे संस्थापक सुधाकर मोहीते व अध्यक्ष चंद्रमणी मोहीते यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.