अंबरनाथ बदलापूर मध्ये फक्त कंटेनमेंट झोन मध्येच लॉकडाऊन. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा


बदलापूर :- ठाणे जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत लॉकडाऊनमध्ये वाढ (Lockdown Extension) करण्याचा निर्णय घेण्यात आला होता परंतु यात बदल करत ठाणे जिल्ह्यात नगरपालिका, नगरपंचायती आणि ग्रामीण क्षेत्रातील फक्त कंटेनमेंट झोनमध्ये 31 जुलैपर्यंत लॉक डाऊन करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला आहे.


 कोरोनाचा (Corona) वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दोन जुलै रोजी ठाणे जिल्ह्यातील नगरपालिका नगरपंचायत आणि ग्रामीण भाग लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी घेतला होता त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील नगरपालिका नगरपंचायत क्षेत्रात लोक डाऊन करण्यात आले होते त्यानंतर आणखी सात दिवस लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला . 


जिल्हाधिकारी यांनी लोक डाऊन संदर्भात घेतलेल्या निर्णय नुसार आज लोक डॉन चा शेवटचा दिवस होता व त्यामुळे जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आज आदेश जारी करून ठाणे जिल्ह्यातील नगरपालिका नगरपंचायत भागातील म्हणजेच अंबरनाथ बदलापूर मुरबाड ह्या भागातील फक्त कन्टेन्ट झोनमध्ये 31 जुलैपर्यंत लोक डॉन करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिका हद्दी करिता मुख्याधिकारी यांना कंटेनमेंट झोन ठरविण्याचे अधिकार दिले आहेत तर शहापूर मुरबाड नगरपंचायत तसेच ग्रामीण भागाकरिता उपविभागीय अधिकारी यांना कंटेनमेंट झोन जाहीर करण्याचे अधिकार दिले आहेत.त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या कंटेनमेंट  झोनमध्ये  31 जुलैपर्यंत लॉक डाउन राहणार आहे.


Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...