देशात करोना व्हायरसचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. महाराष्ट्रावर आलेल्या या करोना संकटात पोलिस आपल्या आरोग्याची पर्वा न करता सेवा करत आहे. ही सेवा बजावत असताना पोलिस दलातील कर्मचाऱ्यांना कोरोना ची लागण होत असल्याचे दिसून आले आहे. आता ह्या कोरोनाने बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात शिरकाव केला असून तब्बल सात कर्मचारी एक अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. त्यातील एक अधिकारी हे दोन दिवसांपूर्वीच कोरोना पॉझिटिव झाले होते. तर त्यानंतर आज सात कर्मचारी पॉझिटिव्ह आले आहेत.
बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात एका आरोपीला आणले होते तो बाधित आढळल्यानंतर सात कर्मचारी पॉझिटिव्ह झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यातील एकमेकांच्या संपर्कात असलेल्या दहा जणांचे घेण्यात आले होते. त्यातील सात जण पॉझिटिव्ह आले आहेत. तर बदलापुरात आज 31 रुग्ण आढळले असून बाधितांचे नातेवाईक व पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. बदलापूर पश्चिमेकडे रमेशवाडी येथील एका 56 वर्षीय महिलेचा आज मृत्यू झाला असून बदलापूराय एकूण 14 जणांचा मृत्यू झाले असून कोरोना बाधितांचे संख्या ही 649 वर गेली आहे.
राज्यात करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारनं लॉकडाऊन घोषित केला होता. लॉकडाऊनच्या काळात पोलिसांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य निभावलं आहे.