वडोलगावातील राहत्या घरांची जागा एमआयडीसीने अखेर वगळली, आमदार किणीकर यांच्या पाठपुराव्याला यश.


 


अंबरनाथ :- येथील पश्चिम भागातील वडोलगाव मधील रहिवाशांच्या राहत्या घरांच्या जागेचा प्रश्न अखेर  निकाली लागला आहे. वडोलगाव  येथील डी. डी. स्कीम १५ पैकी सिटी सर्वे नं.४००३ मधील सीट नं.१८ आणि २५ मधील जागेवर  महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अशी नोंद होती परंतु या ठिकाणी राहणारे रहिवाशी गेल्या ८० वर्षांपासून म्हणजेच महामंडळाच्या स्थापनेच्या अगोदर पासून  ह्या ठिकाणी वास्तव्यास आहेत. तसेच या सर्वे नंबरच्या सातबारा उताऱ्यावर तेथील इतर अधिकारात सन-१९३५ पासून वडोलगावातील घरांची नोंद असून गावची जागा व घरे सोडून बाकी जमिनीचा ताबा महामंडळाला दिला असल्याबाबतचा उल्लेख आहे. असे असताना हे औद्योगिक विकास महामंडळ गावची जागा वगळत नव्हते. याची दखल घेत स्थानिक आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांनी या भागात राहणाऱ्या रहिवाशांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन दरबारी गेली अनेक वर्षे पाठपुरावा केला . तसेच विधिमंडळाच्या अधिवेशनात देखील विविध पध्दतीने हा मुद्दा सभागृहाच्या समोर मांडला होता. आणि त्या अनुषंगाने तत्कालीन उद्योग मंत्री व उद्योग राज्यमंत्री यांच्या दालनात बैठक देखील घेण्यात आल्या होत्या. अखेर आमदार किणीकर यांच्या प्रयत्नांना यश आले आणि अखेर


महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने या जागा वगळल्या असल्याचे शुक्रवारी उद्योग विभागाने प्रसिद्ध केलेल्या राजपत्रात नमूद केले आहे. अखेरीस तेथील नागरिकांना न्याय मिळाला आहे.


आमदार  डॉ.बालाजी किनिकर यांनी सातत्यपूर्ण केलेल्या पाठपुराव्यामुळे ह्या भागातील नागरिकांना अखेर न्याय मिळाल्याने आमदार किणीकर यांनीमु ख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे,  उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचे विशेष आभार मानले आहेत.


 


#ShivSena #ShivsenaAmbarnath #shivsenaulhasnagar


Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...