इयत्ता दहावी निकालाची तारीख अखेर जाहीर झाली आहे. उद्या म्हणजेच 29 जुलै रोजी दुपारी 1 वाजता बोर्डाच्या वेबसाईटवर दहावीचा निकाल जाहीर होणार आहे.
‘या’ वेबसाईटवर निकाल पाहता येणार
www.mahresult.nic.in
www.sscresult.mkcl.org
www.maharashtraeduction.com
दहावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी (29 जुलै) रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. या परीक्षेत झालेल्या सर्व विषयांचे गुण वेबसाईटवर पाहता येतील.
ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून विद्यार्थ्यांना अनिवार्य विषयांत (श्रेणी विषय वगळता) मिळालेल्या गुणांची पडताळणी (रिचेकिंग) किंवा उत्तरपत्रिकांची फोटोकॉपी, पुनर्मूल्यांकन, स्थलांतर प्रमाणपत्र यासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने स्वतः किंवा शाळेमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.