कोरोना पेक्षा ग्राहकांना महावितरण'च्या बिलांची धास्ती

 


बदलापूर :  सोमवारी सकाळपासून महावितरणचे कार्यालय उघडल्यानंतर विज बिल कमी करण्यासाठी बदलापूर पश्चिमेकडील ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. गेल्या तीन महिन्यांपासून ज्यादा आलेले बिल कोणत्याही परिस्थितीत कमी करून द्या, अशी एकमुखी मागणी हे जमलेले ग्राहक करत होते. आपल्या तक्रारी मांडताना महावितरणचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने ग्राहकांच्या संतापात भर पडत होती. या वेळी येथे उपस्थित असलेल्या महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ग्राहकांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र ग्राहक कोणत्याही परिस्थितीत समजून घ्यायला तयार नव्हते. कोरोना च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना वीज बिले आली नाहीत. तीन महिन्यानंतर ती बिले प्रचंड आली आहेत. त्यामुळे ग्राहक भरडला गेला आहे. ग्राहक जेव्हा महावितरणच्या वीज बिल भरणा केंद्र जवळ आणि कार्यालय जवळ आले तेव्हा येथे ग्राहकांची संख्या प्रचंड होती. त्यामुळे याठिकाणी सोशल डिस्टंसिंग ते अक्षरशः तीन-तेरा वाजल्याचे पाहायला मिळालं. उपस्थित असलेल्या अनेक ग्राहकांना तर कोरोना पेक्षा महावितरणच्या आलेल्या बिलांची जास्त धास्ती असल्याचं दिसत होते. समाज माध्यमांवर अशा प्रकारे प्रचंड व्हिडिओ व्हायरल झाल्याने महावितरण आता या वाढलेल्या वीज बिलाबाबत नक्की काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. वेगवेगळ्या भागात दररोज महावितरणची बिल्ल पोहोचत असल्याने ज्या भागात जशी वीज बिले पोहोचत आहेत असे त्या भागातील नागरिक येऊन महावितरणच्या कार्यालयात आपले गाऱ्हाणे मांडत आहेत. 


 बदलापूर पूर्वेला देखील अशाच प्रकारे वीज बिलांच्या तक्रारींसाठी नागरिकांनी लांबचलांब रांग लावली होती. या ठिकाणी मात्र महावितरणने मेन गेट बंद करून दहा दहा जणांना आज सोडत होते. मात्र येथेही सोशल डिस्टंसिंग ते कोणत्याही प्रकारे नियमांचे पालन करण्यात येत नव्हते. बदलापूर शहरात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत असताना महावितरणच्या कार्यालयाजवळ ग्राहक प्रचंड संख्येने जमुन एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात गोंधळ घालत असल्याने भविष्यात महावितरणचे कर्मचारी आणि ग्राहक दोघांनाही कोरोना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महावितरणने या तक्रारीबाबत आणि वाढीव वीज बदलांबाबत तातडीने निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत सुज्ञ ग्राहक व्यक्त करत आहेत.  सरकार करत असलेल्या कोरोना रोखण्यासाठीच्या उपाययोजना अशा प्रकारामुळे गांभीर्य उरणार नसल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत।



Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...