पोलीस दलातल्या जुळ्या भावांचा ८ दिवसांच्या फरकाने कोरोनामुळे मृत्यू


अंबरनाथ :- राज्यभरातील कोरोना रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत आहे. दरम्यान जनतेच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी पोलीस कर्मचारी देवाच्या रुपात हे रस्त्यावर उतरले आहेत. दरम्यान पोलिसांना कोरोना होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. दरम्यान अनेक पोलिसांना आपला जीवही गमवावा लागत आहे. त्यातच अंबरनाथमधून आणखी एक दु:खद घटना समोर आली आहे. पोलीस दलातल्या २ जुळ्या भावांचा ८ दिवसांच्या फरकाने कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


दिलीप रामचंद्र घोडके आणि जयसिंग रामचंद्र घोडके यांचा कोरोनामुळे दु:खद निधन झाले आहे. दोन्ही भाऊ पोलीस दलात सेवा बजावत होते. दिलीप घोडके हे उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात हवालदार होते, तर जयसिंग घोडके अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात हवालदार होते.


हे दोघेही जुळे भाऊ एकाच दिवशी पोलीस दलात भरती झाले होते आणि त्यांनी एकत्रच ट्रेनिंग देखील पूर्ण केलं होतं. दिलीप घोडके यांचा २० जुलै रोजी तर जयसिंग घोडके यांचा २८ जुलै रोजी कोरोनामुळे मृत्यू झाला. यामुळे पोलीस दलावर शोककळा पसरली आहे.


Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...