बदलापूर – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शिवभक्त सुजित मंडलिक तर्फे आज बुधवार ता १९ फेब्रवारी रोजी बदलापूर पश्चिम मध्ये नागरीकांना सकाळी ०८ पासून मोफत रिक्षा प्रवास सुविधा देऊन नागरीकांना एक अनोखी भेट दिली.
आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त बदलापूरमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचवेळी शिवभक्त सुजित मंडलिक यांनी आज आगळी वेगळी शिवजयंती साजरी केली. बदलापूर पश्चिम मधील बहुतांश नागरीक रिक्षा ने प्रवास करतात, वडवली, बेलवली या भागात राहणारे नागरिकांसाठी ही सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात आली. बेलवली रिक्षा स्टँडवर आपल्या रिक्षावर भगवा ध्वज आणि विनामुल्य रिक्षा सेवेचा स्टिकर लावण्यात आले होते. सर्व रिक्षा प्रवाशांसाठी विनामुल्य सेवा देण्यात आली. या सेवेचा शुभारंभ राष्ट्रवादीचे पालिका गटनेते आशिष दामले , मा.नगरसेवक प्रभाकर पाटील, आदींच्या उपस्थित झाला. बदलापूर पश्चिममध्ये शिवजयंती निमित्त प्रथमच मोफत रिक्षाने प्रवास करण्यास नागरीकांना मिळाल्याने त्यांनी ही चांगला प्रतिसाद देत आनंद व्यक्त केला.
शिवजयंती निमित्त बदलापूर मधील नागरिकांना अनोखी भेट
Featured Post
मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम
मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...
-
बदलापूर :- बहुप्रतिक्षित नगरपालिका निवडणुकीची आरक्षण सोडत आज संपन्न झाली. आज जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीचा शहरातील सर्वच राजकीय ...
-
मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...
-
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी राजभवन येथे आयोजि...
-
अंबरनाथ : एकनाथ शिंदे गटात सामील असलेले शिवसेनेचे बंडखोर आमदार डॉ. बालाजी किणीकर यांना गोळी घालून जीवे मारण्याची धमकी देण्यात ...
-
अंबरनाथ : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे, आ. गुलाबराव पाटील आणि आ. डॉ. बालाजी किणीकर यांच्या समर्थनार्थ आज अंबरनाथमध्ये एकव...