पाण्याचे मीटर चोरी होण्याच्या घटनांमध्ये वाढ
बदलापूर :- घरफोडी आणि सोनसाखळीचोरीच्या घटना शहरात घडत असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (पाणीपुरवठा) विभागाने सोसायट्यांमध्ये लावलेले पाण्याचे मीटरही मोठ्या प्रमाणावर चोरीला गेल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. महिनाभरात ५० ते ६० मीटर चोरीला गेले आहेत. याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यांमध्ये नागरिकांनी तक्रारअर्ज देऊनही मीटरचोरांचा थांगपत्ता लागलेला नाही. मुख्य म्हणजे पोलीस एफआयआर दाखल करून घेत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तसेच नवीन मीटरच्या खर्चाचा भुर्दंड आणि मीटर नसल्याने जादा बिले येण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.
बदलापूर पश्चिम भागातील रमेशवाडी, बॅरेज रोड, हेंद्रेपाडा या प्रमुख ठिकाणांसह बहुतांश ठिकाणच्या सोसायट्यांमधील पाण्याचे मीटर चोरीला गेले आहेत. पूर्व भागातही या चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. गेल्या सहा महिन्यांत अनेक पाणीमीटर चोरीला गेली आहेत. या घटनांप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल झाल्या आहेत.
एफआयआर नोंदवण्यास टाळाटाळ
मीटर चोरीला गेल्याने संबंधित सोसायट्यांमधील सध्या किती प्रमाणात पाणी वापरले जाते, याची मोजदादच होत नाही. त्यामुळे मजिप्राकडून भरमसाट पाण्याची बिले आकारण्यात येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे सोसायटीतील रहिवासी यांनी सांगितले. त्याचबरोबर तक्रार अर्ज घेताना पोलिसांकडून एफआयआर नोंदवून घेत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
पाण्याचे मीटर चोरी होण्याच्या घटनांमध्ये वाढ
Featured Post
मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम
मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...

-
अंबरनाथ : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे, आ. गुलाबराव पाटील आणि आ. डॉ. बालाजी किणीकर यांच्या समर्थनार्थ आज अंबरनाथमध्ये एकव...
-
सुवर्णा साटपे यांचा आगळा वेगळा उपक्रम बदलापूर: भारतीय संस्कृतीमध्ये वटपोर्णिमा सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे वटपौर्णिमेच्या सण...
-
अंबरनाथ : एकनाथ शिंदे गटात सामील असलेले शिवसेनेचे बंडखोर आमदार डॉ. बालाजी किणीकर यांना गोळी घालून जीवे मारण्याची धमकी देण्यात ...
-
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी राजभवन येथे आयोजि...
-
आज ५ जून जागतिक पर्यावरण दिन जगभरात दरवर्षी ५ जून रोजी साजरा केला जातो. पृथ्वीच्या संरक्षण, संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी हा ...