अफवा तसेच जनतेची दिशाभूल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
ठाणे दि -- जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणूसंदर्भात अफवा पसरवल्याप्रकरणी तसेच जनतेची दिशाभूल केल्याप्रकरणी ठाणे जिल्ह्यामध्ये भिवंडी येथील नारपोली पोलीस ठाणे येथे एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गंभीर आजाराबाबत अफवा पसरवल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेला हा जिल्ह्यातील पहिलाच गुन्हा आहे. पोलीस उपायुक्त पोलीस राजकुमार शिंदे आणि त्यांच्या पथकाने बाळसाहेब सर्जेराव डावखर, वैद्यकीय अधिकारी, खारबाव प्राथमिक आरोग्य केंद्र, भिवंडी यांच्या तक्रारीवरुन सदर कारवाई केली आहे.
अरिहंत मॅट्रेसेस चे मालकांनी दि. 13 मार्च रोजी एका गुजराथी दैनिक वृत्तपत्रात ‘‘ arihant mattress ANTI-CORONA VIRUS Mattress पे सोएगा इंडिया तो बढेगा इंडिया CORONA RESISTANCE MATTRESS (6ft x 6ft x 5in) Rs 15000/- Visit our Sleep Gallery @ Wooden' Za Furniture Kasheli ( Furniture Market) Bhiwandi या मथळयाखाली जाहिरात दिली होती.
या मॅटरेसमुळे कोरोना विषाणूला प्रतिबंध होईल असे जनतेच्या मनामध्ये समजूत करून जनतेची दिशाभूल करणारी जाहीरात प्रसिध्द केली. तसेच सदर मॅट्रेस वुडनझा फर्निचर, कशेळी, भिवंडी व बिल्डींग क्र. सी-15, गाळा क्र 101, 102, पारसनाथ कॉम्पलेक्स, वळपाडा, दापोडा रोड, पोस्ट अंजुर, ता भिवंडी, जि. ठाणे येथे विक्री करीता उपलब्ध आहेत, तसेच त्याव्दारे त्यांनी कोरोना विषाणूला प्रतिबंध होर्इल असा खोटा दावा करुन जनतेमध्ये त्याबाबत अफवा पसरविली.
सदर मालकाविरुद्ध नारपोली पोलीस ठाणे येथे गुरक्र 166 भादवि कलम 505(2) सह आपत्ती व्यवस्थापन कायद कलम 52 सह औषधीद्रव्य व तिलस्मी उपचार (आक्षेपार्ह जाहीराती) अधिनियम 1954 कलम 3,4,5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा पुढील तपास पोउपनि भाट करीत आहेत.
अफवा तसेच जनतेची दिशाभूल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
Featured Post
मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम
मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...
-
RYAN INTERNATIONAL SCHOOL, AMBARNATH NATIONAL DOCTOR'S DAY National Doctors Day was celebrated in Ryan International S...
-
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी राजभवन येथे आयोजि...
-
निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहार या तीन राज्यांतील विधानपरिषदेच्या निवडणूक कार्यक्रमाची आज (बुधवारी) घोषणा के...
-
बदलापूर :- येथील शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २३ वा वर्धापन दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात...