बदलापूर : बदलापूरमध्ये कोरोनाचे तीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांचे ८ एप्रिल रोजी स्वॅप टेस्टिंग करता पाठवले होते, त्याचा अहवाल १० एप्रिल रोजी रात्री उशिरा
प्राप्त झाला. अहवाल Positive आल्यानंतर रुग्णाच्या संपर्कात आलेेल्या लोकांना quarantine करण्यात आले आहे.
पूर्व भागात राहणारे पोलिसाची पत्नी (४५), मुलगी (२०) यांना कोरोनाची लागण झाली आहे. लॉकडाऊन असताना साताऱ्याला नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी गेले असता तिथे पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्यांना लागण झाली आहे तर पश्चिम भागातील रुग्ण हा वोकहार्ट हॉस्पिटलमध्ये कर्मचारी आहे.
तिघेही बदलापूर पालिकेच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये होते, आता
तिघांनाही ठाणे येथील सिव्हील कोव्हीड स्पेशल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.अशी माहिती मुख्याधिकारी बोरसे यांनी दिली आहे. बदलापूर मध्ये कोरोनाचे तीन रुग्ण आढळले आहेत, त्यामुळे बदलापूर करांनी घराच्या बाहेर पडून हे नये घरातच थांबावे, कोरोना विषाणूला रोखण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्ष प्रियेष जाधव यांनी केले आहे.