बदलापूर शहरातील रुग्णांच्या संख्येत आज धक्कादायक वाढ झालेली दिसून आली. आज 26 व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव आल्याने शहरातील रुग्णसंख्या 380 इतकी झाली आहे. आज एकूण 37 जणांचे कोरोना अहवाल पालिकेत प्राप्त झाले त्यापैकी 11 अहवाल निगेटिव्ह तर 26 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
आज पॉझिटिव आलेल्या 26 व्यक्तींमध्ये 18 व्यक्ती हे विविध बाधित व्यक्तीच्या संपर्कातील आहेत. तर अन्य रुग्ण हे नगरपालिका कॉन्ट्रॅक्टर, 2 बीएमसी कर्मचारी, ग्रामीण रूग्णालय परिचारिका, सुरक्षा रक्षक , खासगी कंपनी कर्मचारी, आरपीएफ आणि पोलीस यांचा समावेश आहे.
नगरपालिका क्षेत्रातील 197 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर आतापर्यंत 174 रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. तर आतापर्यंत 9 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.