बदलापुरात आज दिवसभरात सायं. ६.०० वाजेपर्यंत पाच पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे शहरातील बाधितां चा आकडा २६६ पर्यंत पोहोचला आहे, तर एका महिलेचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना मुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ०८ इतकी झाली आहे. दरम्यान गुरुवारी आणखी 18 जण कोरोना मुक्त झाले आहेत.
आज पर्यंत बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या १३७ असून १२१ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज मृत्यू झालेली महिला ही भाजीविक्रेता असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे. इतर चार रुग्णांमध्ये प्रत्येकी एक रुग्ण बीच कँडी मुंबई आणि क्रिटी केअर हॉस्पिटल अंधेरी येथे असून दोन रुग्ण बाधित व्यक्तीच्या संपर्कातील आहेत.