बदलापूर शहरातील कोरोना रुग्णसंख्या ५२७ तर ॲक्टिव रूग्ण २४२

बदलापूर :- शहरातील २६ रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पालिका क्षेत्रातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ५२७ इतकी झाली आहे. आतापर्यंत २७४ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून ते बरे होऊन घरी गेलेले आहे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे.२४२ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 


नगरपालिकेस आज ४० जणांचे अहवाल प्राप्त झाले त्यापैकी १३ अहवाल निगेटिव्ह,  २६ अहवाल पॉझिटिव्ह एक अहवाल इनकनक्लुसिव आला आहे. नगरपरिषदेने आतापर्यंत ११९३ व्यक्तींचे swab  तपासणी केलेली आहे. तर नगरपरिषदेच्या अलगीकरण कक्षात १०६ नागरिक असल्याची माहिती नगर परिषदेच्या वतीने  प्रसिद्धी करण्यात आलेल्या  माहिती  पत्रकात देण्यात आली आहे.


Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...