अंबरनाथ:- अंबरनाथ शहरात आज कोरोनाचे तब्बल ६२ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे अंबरनाथ शहरातील कोरोना ग्रस्तांची संख्या ६८० झाली आहे.
आज नगरपालिकेत 88 जणांचे अहवाल प्राप्त झाले त्यापैकी 25 अहवाल निगेटिव्ह तर 63 अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या पैकी एक जण यापूर्वीच कोरोना मुक्त झालेला आहे. त्याची माहिती पालिकेत आत्ता कळविण्यात आली आहे अशी माहिती पालिका प्रशासनाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या प्रेस नोट द्वारे देण्यात आलेली आहे.
आतापर्यंत 268 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सद्यस्थितीला 393 रुग्णांवर उपचार सुरू आहे. आतापर्यंत वीस जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.