अंबरनाथ शहरात असलेल्या शिव मंदिरामुळे शहराला ऐतिहासिक महत्व आहे. ११ व्या शतकातील पवित्र मंदिराला भेट देण्यासाठी आसपासच्या शहरातून, राज्यातून हजारो भक्त दरवर्षी येत असतात. त्याचप्रमाणे ऐतिहासिका वास्तूंचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांसाठीही हे मंदीर निरिक्षणाचे केंद्र आहे. या शिव मंदिराच्या सुशोभीकरणासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून ४८ कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून पुरातत्व खात्याच्या मदतीने त्याचे सुशोभीकरण केले जाते आहे. सुशोभीकरण पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी भेट देणाऱ्यांची संख्या अनेक पटींनी वाढण्याची शक्यता आहे. डॉ श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून दरवर्षी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचा शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हल आयोजित केला जातो. या कला महोत्सवात सहभागी होण्यासाठी हजारो रसिक येत असतात. अंबरनाथ शहरात असलेली ऑर्डनन्स फॅक्टरी, रेल नीर प्लांटसह सुमारे 160 मोठ्या क्षमतेचे उत्पादन कंपन्या आहेत. ज्यात बहुराष्ट्रीय कंपन्यांचाही समावेश आहे. अंबरनाथ हे मुंबई आणि महानगर प्रदेशातील वसाहतींना पर्याय म्हणून विकसित होत आहे. मुंबईच्या उपनगरीय रेल्वे सेवेचा वापर करून अंबरनाथ स्थानकात पर्यटक, कामगार, भक्त शहरात येत असतात. त्यामुळे औद्योगिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा असलेल्या या रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरण आणि सुशोभीकरण करण्यासाठी या अंबरनाथ स्थानकाला वारसा स्थानक म्हणून घोषीत करण्याची मागणी नुकतीच कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात नियम ३७७ अन्वये केली. लोकसभेत डॉ. श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथ रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास हा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई पुनर्विकास प्रकल्पाच्या धर्तीवर करावा अशीही आग्रही मागणी केली.
अंबरनाथ स्थानकाचा पुनर्विकास मुंबई सीएसटी स्थानकाच्या धर्तीवर करा - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची लोकसभेत आग्रही मागणी, वारसा स्थानक घोषीत करण्याचीही मागणी
ठाणेः धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व असलेल्या अंबरनाथच्या शिव मंदिराला भेट देण्यासाठी आणि येथील शिवमंदिर आर्ट फेस्टिवलमध्ये सहभागी होण्यासाठी हजारो नागरिक अंबरनाथमध्ये येत असतात. औद्योगिक शहर म्हणूनही ओळख असलेल्या या अबंरनाथ शहराच्या रेल्वे स्थानकाचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे औद्योगिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा टिकवून ठेवण्यासाठी अंबरनाथ रेल्वे स्थानकाला वारसा स्थानक म्हणून घोषीत करून त्याचा विकास मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) पुनर्विकास प्रकल्पाच्या धर्तीवर करण्याची मागणी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेत केली आहे. यापूर्वीही तत्कालिन रेल्वे मंत्र्यांकडे याबाबतची मागणी केली होती.
Featured Post
मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम
मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...
-
मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...
-
मुंबई : सीबीएसई आणि आयसीएसई प्रमाणं दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आल्याची माहिती आरोग्य...
-
INVESTITURE CEREMONY 2022-23 The Investiture ceremony being the most awaited ceremony by the students was celebrated at ...
-
RYAN INTERNATIONAL SCHOOL, AMBARNATH NATIONAL DOCTOR'S DAY National Doctors Day was celebrated in Ryan International S...
-
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी राजभवन येथे आयोजि...