बदलापूर : नगरपालिकाहद्दीतील प्रत्येक प्रभागात प्रभाग स्तरावर ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी केंद्र उभारण्यात यावे अशी मागणी अशी मागणी पार्टी ऑफ युनाइटेड इंडियन्स चे बदलापूर शहराध्यक्ष विजय गुलाटी यांनी लेखी निवेदनांद्वारे मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.
आपल्या निवेदनांत विजय गुलाटी यांनी नमूद केले आहे कि, 'नगरपरिषद परिसरातील स्वच्छता त्याच प्रमाणे आरोग्यावर योग्यप्रमाणे नियोजन करून कार्य करत आहात त्याबद्दल पक्षातर्फे आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. हे सर्व करत असताना परिसरातील गृहनिर्माण सहकारी सोसायट्यांच्या काही समस्या आहेत त्याकडेही लक्ष देणे तेवढेच गरजेचे आ नगररिषदेने पत्र काढ्न ज्या सोसायटी मध्ये १०० किलो किंवा त्यापेक्षा जास्त कचरा दररोज गोळा होतो त्या सोसायटीला आपण ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी केंद्र उभारण्यास सांगितले आहे.
गेल्या एक ते दीड वर्षामध्ये प्रत्यक्ष पाहणी केल्या नंतर हे लक्षात आले की, सोसायट्यांनी पुढाकार घेऊन आपल्या सोबत चालण्यास तयार होऊन प्रयत्न केले परंतु ते सांभाळताना प आजूबाजूच्या रहिवाश्यांना त्यापासून तास होत आहे. त्याचप्रमाणे बहुतेक सोसायट्यांमध्ये केंद्र उभारणीसाठी योग्य जागा नाही आणि केंद्र उभारणीसाठी आर्थिक बळ पण नाही त्याच पुरेपूर ज्ञान पण नाही ज्यांनी केंद्र चालू केलेत त्यांच्या खताला मागणी पण नाही. अश्या परिस्थितीत ते खत पडूनपडून कुजत आहे दुर्गधी होत आहे. त्यामुळे ते आरोग्याला घातक ठरत आहे. गृहनिर्माण सोसायट्या ह्या व्यावसायिक संस्था नसून सहकारी संस्था आहेत ज्या रहिवाशांच्या खर्चातून चालवल्या जातात हे सोसायक परवडण्यासारखे नाही. आधीच आपण मालमत्ता करामध्ये वाढ केली आहे प्रकल्पाचा देखभाल खर्च यामुळे रहिवाश्यांना आर्थिक भार सोसावा लागत आहे.
गुलाटी यांनी दिलेल्या पत्रावर नगरपालिका प्रशासन काय कार्यवाही करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रभाग स्तरावर ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी केंद्र उभारण्यात यावे
Featured Post
मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम
मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...

-
सुवर्णा साटपे यांचा आगळा वेगळा उपक्रम बदलापूर: भारतीय संस्कृतीमध्ये वटपोर्णिमा सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे वटपौर्णिमेच्या सण...
-
अंबरनाथ : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे, आ. गुलाबराव पाटील आणि आ. डॉ. बालाजी किणीकर यांच्या समर्थनार्थ आज अंबरनाथमध्ये एकव...
-
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी राजभवन येथे आयोजि...
-
अंबरनाथ : एकनाथ शिंदे गटात सामील असलेले शिवसेनेचे बंडखोर आमदार डॉ. बालाजी किणीकर यांना गोळी घालून जीवे मारण्याची धमकी देण्यात ...
-
RYAN INTERNATIONAL SCHOOL, AMBARNATH NATIONAL DOCTOR'S DAY National Doctors Day was celebrated in Ryan International S...