गुजरातच्या अहमदाबाद स्थित मोटेरा स्टेडियममध्ये लाखोंच्या उपस्थितीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मैत्रीचा एक खास क्षण पाहायला मिळाला. बोलता बोलता मध्येच डोनाल्ड ट्रम्प क्षणभर थांबले आणि त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी हात मिळवला. 'नमस्ते' म्हणत ट्रम्प यांनी भारतीय जनतेला अभिवादन केलं. भारतानं दाखवलेल्या प्रेमाबद्दल आभारी आहे, हा क्षण आमच्या आयुष्यभर लक्षात राहील, असंही ट्रम्प यांनी यावेळी म्हटलं. यावेळी, ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींचंही तोंड भरून कौतुक केलं.
पंतप्रधानांनी एक 'चहावाला' म्हणून सुरुवात केली होती. त्यांच्यावर प्रत्येक व्यक्ती प्रेम करतो, पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की ते चांगलेच कडक स्वभावाचे आहेत. ते एक टफ नेगोशिएटर आहेत, असंही म्हणत त्यांनी नरेंद्र मोदींच्या कौशल्याचंही कौतुक केलं. यावेळीच ते क्षणभर थांबले आणि त्यांनी मोदींशी हात मिळवला.
चायवाला पंतप्रधान !
Featured Post
मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम
मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...
-
बदलापूर :- बहुप्रतिक्षित नगरपालिका निवडणुकीची आरक्षण सोडत आज संपन्न झाली. आज जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीचा शहरातील सर्वच राजकीय ...
-
मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...
-
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी राजभवन येथे आयोजि...
-
अंबरनाथ : एकनाथ शिंदे गटात सामील असलेले शिवसेनेचे बंडखोर आमदार डॉ. बालाजी किणीकर यांना गोळी घालून जीवे मारण्याची धमकी देण्यात ...
-
अंबरनाथ : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे, आ. गुलाबराव पाटील आणि आ. डॉ. बालाजी किणीकर यांच्या समर्थनार्थ आज अंबरनाथमध्ये एकव...