रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ ईस्ट चे माजी अध्यक्ष सी. ए. देवेंद्र जैन यांच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत हि माहीती दिली. या वेळी अध्यक्ष प्रशांत गटकल, माजी अध्यक्ष देवेंद्र जैन, सर्जेराव सावंत, देवराम गागरे, मनोज राणे आदी मान्यवर उपस्थित होते. अंबरनाथ पूर्व विभागातील ठाकरपाड्यात रोटरीच्या वतीने आदिवासी शाळा चालवली जाते. या शाळेत पहिली ते सातवीच्या वर्गात २५० विद्यार्थी शिकतात. या आदिवासी पाड्यात शिक्षणाचा अभाव होता. शहरालगत असलेला या आदिवासी पाड्यात शिक्षणाचा अंधार होता हे लक्षात घेऊन रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ ईस्ट तर्फे या भागात रोटरी आदिवासी शाळा सुरु केली. १९९६ मध्ये हि शाळा सुरु केली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत हि शाळा सुरु केली. या आदिवासी पाड्यात शिक्षणासाठीचे वातावरण नव्हते ते वातावरण निर्माण करून पालकांना आणि विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी या साठी गेल्या २४ वर्षांपासून रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ ईस्ट चे पदाधिकारी सतत प्रयत्न करीत होते. या प्रयत्नांना यश मिळाले असून आदिवासी समाजातील युवक शिक्षण घेऊन मूळ प्रवाहात आल्याचे पाहून समाधान वाटत असल्याचे रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ ईस्टचे अध्यक्ष प्रशांत गटकल यांनी सांगितले. हि शाळा चालविताना अनेक अडचणी येत असतात. मात्र रोटरीचे पदाधिकारी व सदस्य या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करीत असतात. आज शाळेचे स्वरूप चांगले झाले असून या परिसरातील लहान मुले शिक्षण घेत आहेत. चांगले गणवेश, शालेय साहित्य, शाळेच्या वर्गखोल्याही सजवलेल्या आहेत अशा वातावरणात शिक्षक आणि विद्यार्थ्यांना नवनवीन उपक्रम राबवितांना उत्साह येतो.
Featured Post
मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम
मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...
-
RYAN INTERNATIONAL SCHOOL, AMBARNATH NATIONAL DOCTOR'S DAY National Doctors Day was celebrated in Ryan International S...
-
मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...
-
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी राजभवन येथे आयोजि...
-
खोडाळा : गिरीवासी सेवा मंडळ कल्याण संचलित मातोश्री यशोदाबाई मुरलीधर मोहिते कला,वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय खोडाळा जोगलवाडी या महावि...
-
कुळगाव-बदलापूरसह आठ नगरपरिषदेचा आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम जाहीर निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार नगर परिषदांच्या प्रभागांचे स...