बदलापूर शहरामध्ये आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. हा रुग्ण नवी मुंबई येथील एका फार्मा कंपनीत काम करतो, कामाच्या ठिकाणी एक व्यक्ती 3 एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आढळल्याने , त्याच्या संपर्कात आल्यामुळे टेस्ट करणयात आली व ह्या व्यक्ती ला कामाच्या ठिकाणी 15 एप्रिल पासून quarantine ठेवण्यात आले आहे. 18 एप्रिल रोजी ह्या व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला व दिनांक 19 एप्रिल रोजी त्यांना वेदांत हॉस्पिटल ठाणे येथे ऍडमिट करण्यात आले आहे अशी माहिती कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
ही व्यक्ती कामासाठी बदलापूरहून त्यांच्या ऑफिस च्या गाडी ने एकदिवसाआड जात होती, जाताना social distancing चे पालन केले जात होते. तसेच ह्या व्यक्तीच्या घरातील दोन सदस्यांची कोरोना चाचणी करण्यात आली असून ती निगेटिव्ह आली आहे अशी माहिती मुख्याधिकारी प्रकाश बोरसे यांनी दिली तसेच कोरोना बाधित व्यक्ती ज्या बसने बदलापूर वरून त्यांचे 3 सहकारी ऑफिस जात होते, त्यांची ही टेस्ट करण्यात आली, तिघांची टेस्ट देखील निगेटिव्ह आली आहे असेही त्यांनी सांगितले.