अक्षय्य तृतीया साडे तीन मुहूर्त पैकी एक मुहूर्त

शुभ मुहूर्तांपैकी महत्त्वाचे मानले जाणारे म्हणजे साडे तीन मुहूर्त. ज्यात दसरा, गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया हे तीन मुहूर्त आणि दिवाळीतील पाडवा हा अर्धा असे साडेतीन मुहूर्त आहेत. यातील अक्षय्य तृतीया हा मुहूर्त देखील महत्वाचा मानला जातो. या दिवशी तुम्ही तुमच्या कोणत्याही शुभकार्याला सुरुवात करु शकतात. हे चारही दिवस शुभ असल्यामुळे या दिवशी मुहूर्ताची गरज नसते. वैशाख महिन्यात शुक्ल पक्षातला तिसरा दिवस म्हणजे अक्षय्य तृतीया. यंदा २६ एप्रिल रोजी अक्षय्य तृतीया आहे.



नवीन घरात प्रवेश, नवीन वस्तू घेणे, मोठे आर्थिक व्यवहार करणे, नवीन वस्त्र, दागिने विकत घेणे, मातीत आळी घालून पेरणी करणे, शेतजमिनीची मशागत, नवीन वाहन खरेदी करणे अशा गोष्टी अक्षय्य तृतीया दिवशी केल्या जातात. यंदाच्या वर्षी कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनचे जरी अक्षय्य तृतीयावर सावट असले तरीही आपण घरच्या घरी पूजा करून हा दिवस साजरा करु शकतो.


घरी रहा सुरक्षित रहा.  



Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...