बदलापूर :- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यापासून बदलापूर शहरात रिक्षांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती. मात्र शहरात राहणाऱ्या अनेक नागरिकांना मेडिकल इमर्जन्सीसाठी सगळ्यांकडेच खासगी वाहने नसल्याने ऑनकॉल रिक्षांना परवानगी द्यावी अशी मागणी विविध पातळ्यांवरून होती. याच मागणीचा राज्य शासनाने देखील गेल्या काही दिवसांपासून अनेक शहरांमध्ये विचार करून त्याला परवानगी दिली आहे. बदलापूर आणि अंबरनाथ शहरात देखील या ऑनकॉल रिक्षांना परवानगी अंबरनाथ वाहतूक विभागाने दिली असल्याची माहिती अंबरनाथ वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांनी दिली. मेडिकल इमर्जन्सी, मेडिकल निगडीत सामान पोहोचवणे यासह अत्यावश्यक सेवांसाठी या रिक्षांचा वापर नागरिकांनी करावा असे आवाहन सुनील जाधव यांनी केले आहे. सध्या काही मोजक्याच रिक्षांना परवानगी देण्यात आली असून नागरिकांच्या सोयीसाठी यापुढील काळात देखील काही रिक्षांना परवानगी दिली जाऊ शकते. मात्र नागरिकांनी शक्यतो घरातच राहावे आणि सुरक्षित रहावे असे आवाहन सुनील जाधव यांनी केले आहे.
Featured Post
मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम
मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...
-
बदलापूर : बदलापुरात ओमीक्रॉंनचा पहिला रुग्ण आढळून आला आहे.हा २८वर्षीय पुरुष रुग्ण असून पोलीस कर्मचारी असल्याची माहिती कुळगाव बद...
-
मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...
-
RYAN INTERNATIONAL SCHOOL, AMBARNATH NATIONAL DOCTOR'S DAY National Doctors Day was celebrated in Ryan International S...
-
निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहार या तीन राज्यांतील विधानपरिषदेच्या निवडणूक कार्यक्रमाची आज (बुधवारी) घोषणा के...
-
ठाणे :- (जिमाका) ठाणे जिल्ह्यात नागरिकांची गर्दी होऊ नये आणि परस्पर संपर्क वाढून विषाणूचा संसर्ग वाढू नये,म्हणून १४ जून २०२१ ते...