बदलापुरातील त्या ८ जणांचा कोरोना रिपोर्ट आला पॉजीटिव्ह

कुळगाव बदलापूर नगरपरिषदेच्या हद्दीत ३ कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते,या रुग्णांचे नातेवाईक आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या १४ जणांना क्वारंटाईन करण्यात आले होते,त्यामधील ८ रुग्ण पॉजीटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे बदलापुरात कोरोना रुग्णाची संख्या आता ११ झाली आहे.


परंतु आज पॉजीटिव्ह आढळून आलेले रुग्ण हे आधी पॉजीटिव्ह आलेल्या ३ रुग्णाच्या  परिवारातील नातेवाईक आहेत,इतर कुठलेही नवीन रुग्ण नाहीत अशी माहिती यावेळेस नगराध्यक्ष यांनी दिली.


नागरिकांनी घाबरून न जाता जास्तीत जास्त घरात राहावे आणि आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्यावी असे आवाहन नगराध्यक्ष प्रियेश जाधव यांनी यावेळी  केले.प्रशासनाच्या वतीने खबरदारी म्हणून योग्य पाऊले उचलण्यात येत असते, तरी पालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनास सहकार्य करा असेही आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.


Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...