शहरातील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे, रविवारी एक रुग्ण आढळल्यानंतर सोमवारी त्यात नव्याने तीन रुग्णांची भर पडली. त्यामुळे रुग्णांचा आकडा १७ वरून २० वर पोहोचला असला तरी दोन दिवसात चार इतकी रुग्ण संख्या वाढल्याने सर्वांची चिंता वाढली आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच पातळीवर जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
बदलापूर शहरातील पश्चिम भागातील मोतीराम ग्रीन- बदलापूर गाव, रमेश वाडी आणि बेलवली या भागातून प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. तीन रूग्नांपैकी दोन रुग्ण हे मुंबई महापालिका कर्मचारी आहेत तर एक रुग्ण हा खासगी कंपनीत कामाला आहे असे समजते.यापैकी दोन रुग्णांना उल्हासनगर येथील कोविड रुग्णालयात तर एका रुग्णांस ठाणे येथील कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बदलापूर नगरपालिका प्रशासनाने 1) जुना पेट्रोल पंप, कात्रप
2) माऊली चौक , शिरगाव 3) रमेशवाडी 4) गणेशनगर
5) मोहन तुलसी विहार, हेंद्रपाडा 6)मोतीराम ग्रीन, बदलापूर गाव
7) मानव पार्क , बदलापूर पश्चिम 8) जाधव कॉलनी, बेलवली असे एकूण ०८ Contenment झोन जाहीर केले आहेत .
आतापर्यंत बरे होवून डिस्चार्ज झालेल्या कोरोना रुग्णांची एकूण व्यक्तींची संख्या 03 असून १६ जणांवर उपचार सुरू आहेत. सोमवार (२७ एप्रिल) पर्यंत ५८ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर अद्याप 5 जणांचे रिपोर्ट येणे बाकी आहे. नगरपालिकेच्या विलगीकरण कक्षात पंधरा जण असून आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना देखील quarantine करण्यात आले आहे अशी माहिती नगरपालिका मुख्याधिकारी यांनी दिली आहे.