कोरोना अपडेट :- जाणून घ्या बदलापूर शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आणि किती रुग्ण बरे झाले याची सविस्तर माहिती
कुळगाव बदलापूर नगरपालिका क्षेत्रात आज दिवसभरात नवीन ०२ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून आजच्या या ०२ रुग्णां मुळे नगरपालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची संख्या आता ११९ झाली आहे.७७ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत ४० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज (१९ मे)
13 जणांचे स्वब सॅम्पल घेण्यात आले आहेत. आतापर्यंत एकूण 350 जणांचे स्वॅब कलेक्शन करण्यात आलेले आहेत त्यापैकी 58 जणांचे रिपोर्ट प्रतीक्षेत आहेत अशी माहिती कुळगाव-बदलापूर नगरपालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांचा तपशील :-
१. पुरुष वय - 39, शिक्षक, गोविंद सर्वोदय नगर
२. पुरुष वय - २८, सुरक्षारक्षक, बी एम सी , श्रीजी गार्डन बदलापूर