कोरोना अपडेट :- शहरात आतापर्यंत किती रुग्ण बरे झाले, जाणून घ्या सविस्तर माहिती
बदलापूर :- आज 16 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी अकरा व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव आले असून पाच व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये प्रत्येकी दोन व्यक्ती हे अनुक्रमे द्वारकानाथ अपार्टमेंट दत्तवाडी बदलापूर पूर्व व वाडीलाल टॉवर सानेवाडी बदलापूर पश्चिम येथील असून बाधित व्यक्तींच्या कुटुंबातील हे व्यक्ती आहेत तर पाचवा रुग्ण हा परमेश्वर अपार्ट. हेंद्रे पाडा, बदलापूर पश्चिम येथील आहे.
बदलापूर शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 124 इतकी झाली असून आतापर्यंत 40 रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 82 कोरोना रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.