बदलापूर :- शहरात कोरोना बाधितांना आकडा दिवसेंदिवस वाढत असून गुरुवारी १४ नवे रुग्ण आढळून आलेले आहेत. त्यापैकी ०९ रुग्ण हे कोरोना बाधित व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्ती आहेत तर ESIS हॉस्पिटल मुलुंड येथील सफाई कर्मचारी, लीलावती हॉस्पिटल स्टाफ, नरिमन पॉईंट येथील काम असलेली व्यक्ती, लॅब टेक्नीशियन व रेल्वे पोलीस असे 5 रुग्ण आहेत. आज आढळलेल्या 14 नवे कोरोना रुग्णां मुळे बदलापूर शहरातील कोरोना बाधित व्यक्तींची संख्या १३८ इतकी झाली आहे. त्यापैकी ४१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
आज एकूण 20 जणांचे कोरोना अहवाल प्राप्त झाले त्यापैकी 14 व्हाल पॉझिटिव आले तर सहा जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अद्याप 29 जणांचे अहवाल येणे बाकी आहे.