शहरात आज ०९ कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली. कुळगाव बदलापूर शहरातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या १४७ झाली आहे. आतापर्यंत ४३ रुग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर चार रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे १०० रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नगरपालिकेने आतापर्यंत ३६६ जणांचे स्वॅब सॅम्पल घेतलेले आहेत. आज एकूण २१ जणांचे कोरोना रिपोर्ट प्राप्त झाले त्यापैकी १२ निगेटिव ०९ पॉझिटिव्ह आलेले आहेत.
आज पॉझिटिव आलेल्या नऊ रिपोर्ट पैकी चार व्यक्ती ह्या यापूर्वी बाधित असलेल्या व्यक्तींच्या कुटुंबातील आहेत. नगरपालिकेचे शहरातील 46 प्रतिबांधीत क्षेत्र जाहीर केले आहेत.