बदलापूर:- कुळगाव बदलापूर नगरपालिका हद्दीतील ०६ रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव आल्याने शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 153 झाली आहे. दिलासा देणारी बाब अशी की,आणखी १२ रुग्ण बरे होऊन त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे त्यामुळे आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या आता 55 इतकी झाली आहे.एकूण ९४ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.