बदलापूर :- शहरातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून आज ७ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव आला आहे त्यामुळे शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 160 इतकी झाली आहे. तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मनोहर विकास येथील 55 वर्षीय पुरुष तथा प्रभू कृपा बंगला कात्रप येथे राहणाऱ्या ८८ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोोणा मुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींची संख्या सहा इतकी झाली आहे.
बदलापूर नगरपालिकेचे मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार ९९ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू असून आतापर्यंत 55 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नगरपालिकेस आज २० अहवाल प्राप्त झाले त्यापैकी ७ अहवाल पॉझिटिव्ह तर १३ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ७ रुग्णांमध्ये दोन महिला 9 महिन्याच्या गरोदर आहेत त्यांना बदलापूर बाहेरील रूग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत त्यांना त्या हॉस्पिटलमध्ये लागण झाल्याची शक्यता आहे अशी प्राथमिक माहिती पालिकेमार्फत देण्यात आली आहे.