बदलापूर :- शहरात आज १३ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या १७४ झाली आहे. आज अंबिका बिल्डिंग भगवती हॉस्पिटल जवळ, बदलापूर पश्चिम परिसरातील ८५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे शहरातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींची संख्या ०७ पर्यंत पोहोचली आहे.
आज नव्याने आढळलेल्या १३ रुग्णांमध्ये ०९ रुग्ण हे बाधीत व्यक्तींच्य कुटुंबातील आहेत तर प्रत्येकी एक व्यक्ती ही फायर फायटर मुंबई, मुंबई पोलीस,बी एम सी, आणि कुर्ला बस डेपो येथे काम करणारे आहेत. नगरपालिकेत आज एकूण 25 रिपोर्ट प्राप्त झाले त्यापैकी १२ रिपोर्ट निगेटिव्ह तर १३ रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत.
आतापर्यंत ५९ रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत तर १०८ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.सोमवार (२५ मे) पर्यंत ४२२ जणांचे swab सँपल घेण्यात आलेले आहेत.२९ जणांचे रिपोर्ट प्रतीक्षेत आहेत तर नगरपरिषदेच्या अलगीकरण कक्षामध्ये ६० जण आहेत अशी माहिती नगरपरिषदेने प्रसिद्ध केलेल्या प्रेस नोट मध्ये देण्यात आली आहे.