बदलापूर :- कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या बदलापूर करांसाठी आज दिलासा देणारी बातमी आहे. शहरात आज दिवसभरात १२ रुग्ण करोना मुक्त झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज १२ जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याने आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या ७३ झाली आहे.
आज आणखी पाच जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव आल्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन रुग्णांची संख्या १७९ झाली आहे. ७३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत त्यामुळे ९९ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत ०७ जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे.
आज पालिकेने १७ जणांचे swab सँपल घेतले असून अद्याप ३२ जणांचे अहवाल येणे बाकी आहे. आज प्राप्त झालेल्या एकूण १९ अहवाल पैकी १४ अहवाल निगेटिव्ह तर ०५ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
कुळगाव बदलापूर नगरपालिकेने आतापर्यंत ४३९ जणांचे swab collection केलेले आहेत तर नगरपरिषदेच्या अलगीकरण कक्षात ६६ नागरिक आहेत अशी माहिती नगरपालिके मार्फत प्रसारित करण्यात आलेल्या प्रेस नोट मध्ये देण्यात आलेली आहे.