बदलापूर आणि अंबरनाथ शहरात किती आहेत कोरोना रुग्ण जाणून घ्या सविस्तर माहिती
बदलापूर शहरात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या १९२ इतकी असून आज आढळून आलेल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या 13 आहे. आतापर्यंत 85 रुग्ण बरे होऊन त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.१०० रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज पर्यंत मृत्यू झालेल्या व्यक्तींची संख्या ०७ आहे. बदलापूर नगरपालिकेने आत्तापर्यंत एकूण ४३९ जणांचे स्वॅब कलेक्शन केलेले आहे. तर १३ जणांचे रिपोर्ट प्रतीक्षेत आहेत.नगरपरिषदेच्या अलगीकरण कक्षांमधील नागरिकांची संख्या ५६ इतकी आहे.
तर दुसरीकडे अंबरनाथ शहरात कोरोना बाधित व्यक्तींची संख्या ८५ इतकी झाली असून आज आढळून आलेल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या ०७ आहे. आतापर्यंत 32 रुग्ण बरे होऊन त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे तर ५१ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अंबरनाथ मध्ये आज पर्यंत मृत्यू झालेल्या व्यक्तींची संख्या ०२ आहे. अमरनाथ नगरपालिकेने आतापर्यंत ६९० जणांचे स्वॅब सॅम्पल घेतलेले आहेत.१४० जणांचे रिपोर्ट अद्याप प्रतीक्षेत आहेत. नगरपालिकेच्या अलगीकरण कक्षांमधील नागरिकांची संख्या ३१ इतकी असून ३२६ नागरिक स्वतःच्या घरात अलगीकरण करून आहेत.