बदलापूर :- शहरात आज आणखी १२ कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधीत रुग्णांचे द्विशतक पूर्ण होऊन रुग्णांची संख्या 204 इतकी झाली आहे. आज आढळून आलेल्या नवीन रुग्णांमध्ये सर्वाधिक ०८ रुग्ण बदलापूर पूर्व भागातील आहेत तर ०४ रुग्ण बदलापूर पश्चिम भागातील आहेत. आतापर्यंत ०७ जणांचा मृत्यू झाला असून ९६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.१०१ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
१६ मे रोजी कुळगाव बदलापूर शहरातील कोरोना बाधित व्यक्तींची संख्या ९७ इतकी होती तर Active रुग्णांची संख्या ६५ इतकी होती तर केवळ १२ दिवसांमध्ये शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या २०४ इतकी झाली आहे. राज्यात आणि देशात कोरोना रुग्ण दुपटीच्या वेग मंदावत असताना बदलापूर शहरात मात्र तो वाढतांना दिसत आहे. यामुळे शहरातील नागरिकांनी अधिक दक्ष राहून प्रशासनामार्फत होत असलेल्या सूचनांचे पालन करावे आणि स्वतःची काळजी घ्यावी. असे आवाहन करण्यात आले आहे.