शहरातील दुकाने सुरू करण्यास सशर्त परवानगी

बदलापूर :- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी संपूर्ण देशात लॉक डाऊन जाहीर करण्यात आले.लॉक डाऊन मुळे अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद करण्यात आली होती. त्यानंतर तब्बल ६४ दिवसांनी शहरातील दुकाने उघडण्यास सशर्त परवानगी देण्यात आली आहे.


शहरांतील दुकानांची दोन ग्रुप मध्ये विभागणी करण्यात आली आहे.


ग्रुप १ यामध्ये हार्डवेअर, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल,कटलरी, जनरल स्टोअर्स,भांडी, स्पोर्ट्स/खेळणी, बॅग दुकाने,बिल्डिंग मटेरियल सप्लायर, बुक स्टॉल, स्टेशनरी, झेरॉक्स, चष्मा दुकाने, पिठाची गिरणी, फर्निचर/ फेब्रिकेशन दुकाने आदींचा समावेश करण्यात आला आहे. ग्रुप १ मधील दुकाने सोमवार बुधवार आणि शुक्रवार रोजी सकाळी ९.०० ते सायं ५.०० पर्यंत सुरू राहणार आहेत.


ग्रुप २ मध्ये सोने/ चांदीचे दुकान, कपड्याचे दुकान, टेलर, चपल्याचे दुकान, फोटो स्टुडिओ, मोबाईल शॉप, घड्याळाचे दुकान, गॅरेज, रिपअर शॉप, लॉन्द्री, आईस क्रीम पार्लर, स्वीट शॉप आणि पॅकेज dryfruit/बेकरी यांना केवळ पार्सल व्यवस्था या अटीवर परवानगी देण्यात आली आहे.ग्रुप २ मधील दुकाने मंगळवार,गुरुवार आणि शनिवार रोजी सकाळी ९.०० ते सायं. ५.०० पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.


फिजिकल डीस्टन्सी आणि नगरपालिकेने आदेशित केलेल्या अटींच्या आधारे दुकाने सुरू करण्यास परवानगी दिलेली आहे.दुकाने सुरू करण्यास परवानगी दिल्याने शहरातील आर्थिक व्यवहारांना चालना मिळणार आहे. 


 



Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...