बदलापूर :- कोरोनाचे युद्ध अपरिहार्य आहे आणि सगळेजण ते लढत आहेत. कोरोनाच्या सावटात जगताना एक दिलासादायक बातमी आली आहे. आतापर्यंत शंभर जणांनी कोरोना विषाणूवर यशस्वी मात केली असून हे रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या २०६ इतकी असून त्यापैकी ९९ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर ०७ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे.
कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनामार्फत प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार आज आणखी दोघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे त्यामुळे शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 206 झाली आहे. सद्यस्थितीत ९९ ऍक्टिव्ह केसेस आहेत. तर तब्बल १०० रुग्ण बरे झालेले आहेत. त्यामुळे शहरातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४८.५४% टक्क्यांवर आल्याने बदलापूर करांसाठी हे मोठी दिलासादायक बातमी आहे.