आज संध्याकाळी प्राप्त झालेल्या माहितीनुसार बदलापूर शहरात ०७ तर अंबरनाथ मध्ये १७ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे बदलापूर शहरातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा २१३ पर्यंत तर अंबरनाथ शहरातील रुग्णांचा आकडा १३१ इतका झाला आहे.
कुळगाव बदलापूर नगरपालिकेस आज एकूण ३० अहवाल प्राप्त झाले त्यापैकी ०७ अहवाल पॉझिटिव्ह, ११ अहवाल निगेटिव्ह तर दोघांचे अहवाल इन्कलसिवे आलेले आहेत.०७ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव आल्याने शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 213 इतकी झाली असून त्यापैकी १०५ रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत तर 101 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर सात जणांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे.
अंबरनाथ नगरपालिकेस आज एकूण 29 अहवाल प्राप्त झाले त्यापैकी 17 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह,१० निगेटिव्ह तर दोघांचे अहवाल इंकलसिवे आलेले आहेत. आज सतरा रुग्णांचे अहवाल पॉझिटिव आल्याने अंबरनाथ शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या १३१ इतकी झाली आहे. त्यापैकी ४७ रुग्ण बरे झाल्याने त्यांना दिशा देण्यात आलेला आहे तर ८१ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ०३ जणांचा मृत्यू झालेला आहे.