लॉक डाऊन ४ चा टप्पा रविवारी म्हणजेच ३१ मे रोजी संपत आहे पण त्यापूर्वीच केंद्र सरकारने लॉक डाऊन ५ ची घोषणा केली आहे. याबाबत केंद्रीय गृह विभागाने एका परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. लॉक डाऊन ५ मध्ये देशातील कंटेनमेंट झोनमध्ये लॉक डाऊन एक महिन्यासाठी म्हणजेच 30 जून पर्यंत वाढवण्यात आला आहे. लॉक डाऊन ५ मध्ये अनेक गोष्टी शिथील करण्यात आलेल्या आहेत.
केंद्र शासनाकडून नवे नियम जारी करण्यात आले आहेत त्यानुसार कंटेनमेंट झोन सोडून इतर भागात प्रार्थना स्थळ, हॉटेल, रेसटॉरंट सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. येत्या ८ जून पासून या सर्व गोष्टी सशर्त परवानगी ने सुरू होणार आहेत.
प्रतिबंधित क्षेत्र ठरविण्याचा अधिकार प्रत्येक राज्यात देण्यात आलेले आहेत तसेच प्रतिबंधित क्षेत्रात फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर बफर झोन आखण्याचा निर्णय राज्यसरकार घेतील तसेच बफर झोनमध्ये आवश्यक ते निर्बंध राज्य सरकार घालू शकतात.
लग्न समारंभात केवळ 50 तर अंत्यसंस्कारासाठी केवळ वीस लोकांनाच बोलावता येणार
सार्वजनिक ठिकाणी सहा फूट अंतर राखणे बंधनकारक दुकानांमध्ये आंतर राखण्याची जबाबदारी दुकानदाराची तसेच एका वेळी फक्त पाच व्यक्तींनाच दुकानात प्रवेश द्यावा
सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यावर राज्यसरकार दंड आकारणार
सार्वजनिक ठिकाणी दारू पान,गुटखा तंबाखू खाण्यावर बंदी
दुसऱ्या टप्प्यात शााळा, महाविद्यालय आणि इतर शैक्षणिक संस्था राज्य सरकारची चर्चा करून जुलै 2020 मध्ये खुले करता येणार आहेत.
शक्य असेल तर घरूनच काम करा असेही आव्हान करण्यात आले आहे तसेच रात्रीच्या कर्फ्यू वेळ रात्री नऊ ते सकाळी पाच पर्यंत असणार आहे
राजकीय सांस्कृतिक तसेच कोणत्याही स्वरूपाच्या कार्यक्रमाला
अनलॉक १ मध्ये परवानगी देण्यात आलेली नाही तसेच
ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.