बदलापुरात १२ तर अंबरनाथ मध्ये ३५ कोरोना रुग्ण आढळले

बदलापूर मध्ये आज 12 तर अंबरनाथमध्ये 35 नवीन करून बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे बदलापूर शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या २२५ तर अंबरनाथ मध्ये १६६  इतकी झाली आहे. सद्य स्थितीत बदलापूर आणि अंबरनाथ या दोन्ही शहरात प्रत्येकी ११३ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कुळगाव बदलापूर नगरपालिका हद्दीतील १०५ तर अंबरनाथ नगरपालिका हद्दीतील ५० रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत.


अंबरनाथ शहरात आज आढळलेल्या ३५ कोरोना बाधित रुग्णांपैकी ३० रुग्ण बाधित व्यक्तीच्या संपर्कातील आहेत तर बदलापुरात १२ पैकी ०६ रुग्ण बाधित व्यक्तीच्या संपर्कातील आणि ०२ रुग्ण कुळगाव बदलापूर नगर पालिका कर्मचारी आहेत. एकीकडे देश आणि लोक होत असताना दुसरीकडे मात्र बदलापूर आणि अंबरनाथ शहरातील कोरोना बाधित व्यक्तींची वाढणारी संख्या निश्चितच चिंता करावयास भाग पाडणारी आहे. आहे.


Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...