बदलापूर शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आज ४ ने वाढली आहे. त्यामुळे एकूण संख्या २२९ इतकी झाली आहे. त्यापैकी ११७ रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे, तर ठाणे सिव्हिल ०६, उल्हासनगर covid-19 रुग्णालय ०१, सोनिवली कोवाड सेंटर ६८, भाईंदर अलगीकरण कक्ष ०२, सफायार हॉस्पिटल मुंबई व वेदांत हॉस्पिटल, ठाणे येथे प्रत्येकी ०१, आर.आर.हॉस्पिटल, डोंबिवली ०४ व इतर २२ अशा १०५ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आज ०४ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले, त्यापैकी एक जण बॉम्बे हॉस्पिटल कर्मचारी, बस कंडक्टर, बाधीत व्यक्तीच्या संपर्कातील तर व्यक्ती सेवानिवृत्त आहे. कुळगाव बदलापूर नगर पालिकेने आतापर्यंत ५४३ जणांचे स्वॅब घेतलेले आहेत.४९ जणांचे कोरोना अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहेत.