:- आज अंबरनाथ नगरपालिका हद्दीतील 22 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून आतापर्यंत शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या १८८ इतकी झाली आहे. तर आज करणामुळे दोघांचा मृत्यू झाला असल्याची बाब नगरपालिके मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रेसनोट मुळे स्पष्ट झाले आहे. आज मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये १ पुरुष आणि १ महिला आहे. त्यामुळे अंबरनाथ शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ०५ झाली आहे.
आज 62 जणांचे कोरोना अहवाल पालिकेस प्राप्त झाले त्यापैकी 22 अहवाल पॉझिटिव्ह, ३६ निगेटिव्ह तर ०४ अहवाल इनकंक्लिझिव आलेले आहेत.२२ पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये १९ रुग्ण बाधित व्यक्तीच्या संपर्कातील आहेत तर दोन सी आर पी एफ चे जवान तर एक परिचारिका आहे.