दिलासादायक! बदलापूर शहरातील आतापर्यंत 225 रुग्ण झाले बरे

बदलापूर :-  शहरातील २२५ रुग्ण आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेले आहेत त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे ही बाब बदलापूर शहराकरिता नक्कीच दिलासादायक म्हणावी लागेल. आज सात जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने बदलापूर शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४३१ झाली आहे. त्यापैकी 225 रुग्ण बरे झाले आहेत, तर सध्या १९५ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यामुळे सक्रिय रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. ही दिलासादायक बाब मानली जात आहे. तर, शहरातील ११ जणांचा कोरोनामुळे आजपर्यंत मृत्यू झाला आहे.


Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...