अंबरनाथ शहरातील ११६ जणांचा कोरोना अहवाल आज नगरपालिकेस प्राप्त झाले असून ५० अहवाल निगेटिव्ह, ६४ अहवाल पॉझिटिव्ह तर दोघांचे अहवाल इनकनक्लुसिव आले आहेत.
सलग दुसऱ्या दिवशी अंबरनाथ शहरातील कोरोना बाधित रुग्ण संख्येने ६० चा आकडा पार केला असून रविवारी ६२ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर आज ६४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत त्यामुळे केवळ दोन दिवसात कोरोना ग्रस्तांच्या संख्येत १२६ रुग्णांची भर पडली आहे, त्यामुळे शहरातील रुग्णसंख्या ७४४ इतकी झाली आहे.