अंबरनाथ शहरात आज 28 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे त्यामुळे अंबरनाथ शहरातील रुग्णसंख्या 569 इतकी झाली आहे. आज एकूण 39 जणांचे कोरोना अहवाल प्राप्त झाले त्यापैकी 11 अहवाल निगेटिव्ह तर 28 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आज एकशे सहा जणांचे कोरोना चाचणी करण्यात आली असून 260 व्यक्तींचे अहवाल अध्याप प्रलंबित आहेत.
201 + 112 व्यक्तींवर विविध रुग्णालयात तसेच घरगुती अलगीकरण उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 238 जणांनी कोरोना वर यशस्वीरित्या मात केली असून बरे होऊन घरी गेले आहेत त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. नगरपरिषदेने आतापर्यंत 1796 व्यक्तींची कोरोना चाचणी केली आहे. त्यापैकी 950 जणां च्या कोरोना अहवाल निगेटिव्ह आलेला आहे. अशी माहिती अंबरनाथ नगरपरिषद मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रेस नोट मध्ये देण्यात आली आहे.