अंबरनाथ :- मुंबई महानगर प्रदेश भागातील मीरा भाईंदर, ठाणे, नवी मुंबई आणि उल्हासनगर येथील आयुक्तांची बदली केल्यानंतर अंबरनाथ नगरपालिका मुख्याधिकारी यांची देखील आज तडफातडफी बदली करण्यात आली. 10 मे रोजी श्रीधर पाटणकर यांची अंबरनाथ चे मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती.
अवघ्या 43 दिवसात पाटणकर यांची तडफातडफी बदली झाल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे.
प्रशांत रसाळ ( अतिरीक्त आयुक्त, मुख्याधिकारी, पनवेल महानगरपालिका ) यांची अंबरनाथ नगरपरिषद श्रीधर पाटणकर यांच्या जागी, नियुक्ती करण्यात आली आहे.
कोरोना विषाणू संसर्ग नियंत्रणाच्या कामकाजाचे गांभीर्य व निकड विचारात घेऊन त्याबाबतच्या उपाययोजनांचा भाग म्हणून सदर आदेश निर्गमित करण्यात येत आहेत. असे आदेशात नमूद करण्यात आले आहे
प्रशांत रसाळ यांना दि.२४.०६.२०२०(म.नं.) पासून त्यांच्या सध्याच्या पदावरून कार्यमुक्त करण्यात येत आहे. त्यांनी
पदस्थापना दिलेल्या पदावर दि.२५.०६.२०२० रोजी रुजू होवून, तसा अनुपालन अहवाल शासनास तात्काळ सादर करावा. असे आदेश प्रशांत रसाळ यांना देण्यात आले आहेत.