२५ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह तर १९ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज
बदलापूर : कुळगाव बदलापूर नगरपालिका हद्दीतील ४२ जणांचे कोरोना अहवाल आज पालिकेत प्राप्त झाले. त्यापैकी १७ अहवाल निगेटिव्ह तर २५ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे नगरपालिका हद्दीतील एकूण रुग्णांची संख्या ६१८ इतकी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज एकूण १९ रूग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३१६ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून बरे होऊन घरी गेलेले आहेत. २८९ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आज पॉझिटिव आलेल्या 25 रुग्णांमध्ये 14 जण बाधित व्यक्तीच्या संपर्कातील आहेत तर २ मुंबई पोलीस कर्मचारी आहेत.