बदलापूर :- शहरातील २४ रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पालिका क्षेत्रातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ५९३ इतकी झाली आहे. आतापर्यंत २९७ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून ते बरे होऊन घरी गेलेले आहे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे.२८३ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नगरपालिकेस आज ३४ जणांचे अहवाल प्राप्त झाले त्यापैकी १० अहवाल निगेटिव्ह, २४ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. नगरपरिषदेने आतापर्यंत १३१५ व्यक्तींचे swab तपासणी केलेली आहे. तर नगरपरिषदेच्या अलगीकरण कक्षात ८० नागरिक असल्याची माहिती नगर परिषदेच्या वतीने प्रसिद्धी करण्यात आलेल्या माहिती पत्रकात देण्यात आली आहे.