शहरातील कोरोना रुग्ण रिकवरी रेट ५३.८४%, २४ तासात बरे झाले दहा रुग्ण


बदलापूर शहरातील कोरोना रुग्णांची संख्या ७ ने वाढून २७३ इतकी झाली आहे, आतापर्यंत १४७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे, त्यामुळे शहरातील उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या ११८ इतकी आहे. शहरातील कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५३.८४ % म्हणजेच जवळपास ५४% इतके झाले आहे ही निश्चितच बदलापूर कराना दिलासा देणारी बाब आहे. गेल्या २४ तासात दहा रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत.


कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनामार्फत देण्यात आलेल्या माहितीनुसार बदलापूर शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 273 झाली असून आज एकूण सात जणांचे कोरोना अहवाल प्राप्त झाले, हे सातही अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.


अनलॉक १ च्या दिशेने वाटचाल सुरू असताना बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आगामी काळात आणखी खबदारी घेत कोरोनाचे संक्रमण रोखण्यास प्रयत्न करावे लागणार आहेत. लॉकडाऊन देखील काही प्रमाणात उठवण्यात जरी आले तरीही काही नियमांनुसारच जगावे लागणार आहे. स्वतःची योग्य काळजी घेत कोरोनापासून लांब राहावे लागेल. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे अशा विविध गोष्टी करत संक्रमण रोखण्यास मदत होईल.त्यामुळे अपनी सुरक्षा, अपने हाथ हाच पवित्रा सा-यांनी आत्मसात केल्यास, लवकरच आपला देश,आपले राज्य आणि आपले शहर कोरोनामुक्त होईल हे मात्र नक्की.


Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...